ऋषीपंचमी-माहिती-7

Started by Atul Kaviraje, September 20, 2023, 05:20:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "ऋषीपंचमी"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२०.०९.२०२३-बुधवार आहे. आज "ऋषीपंचमी" आहे. असे म्हटले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत केल्यामुळे आपल्या हातून घडलेल्या पापांची मुक्तता होते. तसेच दोषांपासून निवारण होते. पितरांच्या नावाने दानधर्म केला तर आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना ऋषीपंचमीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, ऋषीपंचमी वर महत्त्वाची माहिती.

             ऋषीपंचमी 2023 प्रश्न--

--ऋषि पंचमी म्हणजे काय?
--ऋषीपंचमी 2023 भाद्रपद शुक्ल पंचमीला भारतीय इतिहासातील ऋषींची या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या व्रताला सणाला ऋषिपंचमी असे म्हणतात.

--ऋषिपंचमी का साजरी केली जाते?
--स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळी अनावधानाने घडून गेलेल्या गोष्टींचा तसेच दोषांचे निवारण करण्यासाठी ऋषिपंचमी साजरी केली जाते.

--ऋषि पंचमी कोणत्या महिन्यात साजरी केली जाते?
--ऋषी पंचमी भाद्रपद महिन्याच्या शुक्लपंचमीला साजरी केली जाते.

--यावर्षी २०२३ मध्ये ऋषि पंचमी कधी आहे?
--यावर्षी २०२३ मध्ये ऋषिपंचमी २० सप्टेंबर २०२३ बुधवार या दिवशी आहे.

--ऋषिपंचमीला कोणत्या ऋषींची पूजा केली जाते?
--ऋषिपंचमीला ऋषी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, अत्री, जमदग्नी, गौतम आणि भारतद्वाज या सात ऋषींची पूजा केली जाते.

--ऋषीपंचमीच्या दिवशी काय केले जाते?
--ऋषिपंचमी या दिवशी स्वकष्टाने लावलेल्या झाडांची मुळे आणि भाज्या यापासून ऋषीची भाजी तयार केली जाते.

--ऋषीपंचमीचा उपवास कोण करू शकतो?
--ऋषी पंचमी व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमिला केले जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आणि मुलींसाठी महत्वाचे असून या व्रतामध्ये या दिवशी सात ऋषींची पूजा केली जाते. या दिवशी महिला आणि कन्या सात ऋषींचा आशीर्वाद घेण्यासाठी तसेच सुख, शांती,सौभाग्य आणि समृद्धीची कामना करण्यासाठी हे व्रत करतात.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                     --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.09.2023-बुधवार.
=========================================