पावसाची अलग-थलग प्रेम कविता-अंबरी ढग उमलून येताहेत, अश्रूंना वाट मोकळी करताहेत

Started by Atul Kaviraje, September 21, 2023, 11:42:48 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, पावसाची ढग आसवांच्या समनव्ययाची एक अलग-थलग प्रेम कविता-गीत ऐकवितो. "बादल जो बरसे, तो भीगे तुम हो भिगे हम"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही पावसाने विराम घेतलेली, चक्क लख्ख ऊन पडलेली, परंतु वाराही थांबलेली, गुरुवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-( बादल जो बरसे, तो भीगे तुम हो भिगे हम )
------------------------------------------------------

                "अंबरी ढग उमलून येताहेत, अश्रूंना वाट मोकळी करताहेत"
              -----------------------------------------------------

अंबरी ढग उमलून येताहेत
अश्रूंना वाट मोकळी करताहेत
मनातल्या भावना उचंबळून वाहताहेत,
पावसाच्या जलधारा आसवांना साथ देताहेत

अंबरी ढग उमलून येताहेत
अश्रूंना वाट मोकळी करताहेत
मनाच्या ताण, तणाव, दडपणाना दूर सारून,
शुद्ध, पावन पवित्र भावनांना थारा देताहेत

पाऊस आला की नेहमी असंच घडतं, मला याचाच कोड पडतं
पावसाच्या जलधारांना सोबत करत माझं मन का बरं रडतं ?
कितीही प्रयत्न करतो मी अश्रू रोखण्याचा, पण ते आपसूकच घडतं,
एक नातं असावं पाऊस मनाचं, एकमेकांचं एकमेकांवाचून नेहमीच अडतं

पाऊस येतो, अश्रूंना सोबत करतो, नयनातील काजळ वाहून टाकतो
पाऊस येतो, तना मनाला चिंब करतो, अपवित्र गोष्टींचा निचरा करतो
पाऊस येतो, मांगल्याचा सुगंध शिंपडत पडतो, अमंगळाचा विनाश करतो,
कुठवर राहू मी या पावसाचा ऋणी, नमस्कारासाठी जोडलेला हातही तोकडा पडतो

पाऊस कोण आहे, पाऊस कुठून येतो, पावसाचे उगमस्थान कोणते ?
पाऊस ईश्वर आहे, की त्याचा दूत आहे, की निसर्गाचा चमत्कार आहे ?
एक अगम्य, अनाकलनीय, गूढ, आजवर न सोडवता आलेले रहस्यमय कोडे,
एक गहन, न सुटणारे गणित, या जटील प्रश्नाचे उत्तर कुणाला माहित आहे ?

आता कवितेला थोडं दुसरं वळण देऊया, पण पाऊस कायम ठेऊया
आता कविता थोडीशी दुसरीकडे वळवूया, पण आसवांना कायम स्थान देऊया
पापण्या उघडझाप करताहेत, डोळ्यांतली सप्तरंगी स्वप्ने डोळ्यांतच उमलताहेत,
पापण्या झालर होऊन आसवांचे रक्षण करताहेत, त्या अश्रूंना रोकू पाहताहेत

पण हे अश्रू पुन्हा पुन्हा ढळू लागताहेत, पुन्हा पुन्हा गळू लागताहेत
पापण्यांनाही न जुमानता, हलकेच निसटून गालावरून ओघळू लागताहेत
जणू एक एक आसवांचा मोती होऊन तो मातीत मौक्तिक मIला बनतोय,
मातीत चमकणारा हा लखलखता धवल हिऱ्यांचा हार त्या मातीला मोल देतोय

आणि अशात पुन्हा वीज कडाडतेय, ढगांचे गडगडणे ऐकू येतेय
या भरलेल्या घनांतून पुन्हा जल वर्षतेय, तेही मातीत मिसळतेय
ही माती त्या आसवांना, आणि त्या पडणाऱ्या पाण्याला एक करतेय,
शेवटी सारे काही मातीतच मिळतेय, माती साऱ्यांनाच आपल्यात सामावून घेतेय

प्रेम हलकेच दूर जाताना मी पाहतोय, दोघांची प्रीत जणू दुरावतेय
त्याच्या प्रियेची निज तिचा प्रियकर नेतोय, तिची जणू झोपच उडतेय 
डोळ्यांतील स्वप्नांचा झुला मग फक्त झुलत राहतो, तो रिकामाच असतो,
फुले फुलतI फुलतI अवचित कोमेजून जातात, सुकलेला पाचोळाच साठत राहतो

मिलनाची स्वप्ने पाहणाऱ्या प्रेयसीच्या नयनांत मग आसवांची झडी लागते
प्रीतीचे स्वप्नफुल उमलण्याच्या आधीच कोमेजून जाते, फांदीवरून गळून पडते
ओठांपर्यंत आलेला अमृताचा प्याला आता विष होऊन साऱ्या देहाला जIळत जातो,
मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या त्या नकोश्या आठवणींना उजळत ठेवतो, उगाळत राहतो

या साऱ्यांची पावसाशी नक्की सांगड काय असते, हे मी जाणत नाही
पण आसवांना झरण्यास एक कारण नक्कीच असते, ते निमित्तच होई
ढगातून पडणाऱ्या पाण्याचा आणि आसवांचा संवाद मी कधीच ऐकला नाही,
पण ढग बरसले कि अश्रूंचाही बांध फुटतो, हे अनुभवाने लक्षात येई 

आभाळी ढगांची जुगलबंदी चालली आहे, ते एकमेका वरचढ होताहेत
कधी आकाशातून खाली उतरू पाहताहेत, तर कधी अंबर झाकोळून टाकताहेत
त्यातून झिरपणाऱ्या जलाचा असह्य मारा धरणी मुकाट सहन करतेय, गप राहून सहतेय,
गारवा देण्याऐवजी, शीतलता येण्याऐवजी, जणू तप्त ज्वाळांचा लोळचं जमिनीवर उतरतोय

हा ओला ऋतू आता आता निर्दयीच जाणवू लागलतो, क्रूर दिसू  लागतो
हा जालीम पाऊस आता मन मानेल तसाच पडतोय, मनस्वीच भासू लागतो
हा मोसम असा कसा, पावसाला पIडतI पIडतI तो मनाला रडवत राहतो,
हा पावसाळा असा का तना मनाला शांत करण्याऐवजी अशांत करीत राहतो

हे सारं सोसत सोसत मन मग काबूत रहIत नाही, ते बेकाबु होत
हे सारं मनIस असह्य होतं, तरी मन सहत राहतं, मन दोलायमान होतं
शेवटी मनाचा बांध फुटतो, तो नकळत आसवांच्या रूपे वाहत राहतो,
आभाळी बIदल गरजत बरसत असतो, अन डोळा आसवांचा झरा फुटत असतो

अंबरी ढग उमलून येताहेत
अश्रूंना वाट मोकळी करताहेत
पियाची आठवण प्रकर्षाने येऊ लागते,
त्या आठवणी त्या दिवसात घेऊन जाताहेत

अंबरी ढग उमलून येताहेत
अश्रूंना वाट मोकळी करताहेत
पाऊस सुरु झालाय, थेम्ब पडू लागलेत,
अंती जलधारा आणि अश्रूधारा एक होताहेत

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.09.2023-गुरुवार.
=========================================