दिन-विशेष-लेख-आंतरराष्ट्रीय शांतता दिन-B

Started by Atul Kaviraje, September 21, 2023, 05:47:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                               "आंतरराष्ट्रीय शांतता दिन"
                              ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-21.09.2023-गुरुवार आहे.  २१ सप्टेंबर-हा दिवस "आंतरराष्ट्रीय शांतता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

          आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी आणि का केला जातो साजरा? जाणून घ्या इतिहास--

     international day of peace 2022 know this years theme: आज जगभरातील विविध देशांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमुळे अशांतता आणि युद्धाचे वातावरण आहे. अशावेळी आंतरराष्ट्रीय शांतता ही फार महत्त्वाची आहे. यासाठीच International Day of Peace साजरा केला जातो.

     International Day of Peace: मुंबई: आज जगभरातील (World) विविध देशांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमुळे अशांतता आणि युद्धाचे वातावरण आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील दीर्घकाळ चाललेले युद्ध अद्याप संपलेले नाही. तर दुसरीकडे चीन, पाकिस्तान हे भारतविरुद्ध सतत कुरापती करत आहेत. पण असं वातावरण नाहीसं होऊन, परस्पर बंधुता आणि सौहार्द वाढवण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस (International Day of Peace) साजरा केला जातो. (international day of peace 2022 know this years theme history  significance of day)

     या आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांपासून ते इतर अनेक संस्था विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आंतरराष्ट्रीय शांतता दिन कसा साजरा करायचा, त्याचा नेमका इतिहास आणि उद्देश काय आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

          आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचा इतिहास (International day of peace History)--

     संयुक्त राष्ट्र संघाने 1981 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता दिवस जगभरात साजरा करण्याची घोषणा केली. 1982 मध्ये, सप्टेंबरच्या तिसऱ्या मंगळवारी संयुक्त राष्ट्रांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचे आयोजन केले होते. 1982 ते 2001 पर्यंत, हा दिवस केवळ सप्टेंबरच्या तिसऱ्या मंगळवारी साजरा केला जात होता, परंतु 2002 पासून, संयुक्त राष्ट्रांनी 21 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून घोषित केला.

     तेव्हापासून दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या प्रसंगी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात युद्धात मारल्या गेलेल्यांच्या स्मरणार्थ एक घंटा वाजवली जाते, जी सर्व खंडातील (आफ्रिका वगळता) मुलांनी दान केलेल्या नाण्यांपासून बनविली होती. या नाण्याच्या एका बाजूला 'जगात दीर्घकाळ शांतता नांदू दे' असे लिहिले आहे.

          काय आहे यंदाची थीम? (International day of peace 2022 theme)--

     संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी नवीन थीमद्वारे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्याचे आवाहन करते. या वर्षीही 'समान आणि शाश्वत विकासासाठी उत्तम पुनर्प्राप्ती' ही नवीन थीम ठेवण्यात आली आहे. कोव्हिड-19 साथरोगाच्या काळात लोकांमध्ये दया, आशा, मानवता आणि करुणा जागृत करून आंतरराष्ट्रीय दिन साजरा करावा, तरच या दिवसाचे महत्त्व सिद्ध होईल, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. त्याचबरोबर देशांमधील वाढती स्पर्धा, द्वेष आणि भेदभाव नष्ट करून संयुक्त राष्ट्रांच्या पाठीशी उभे राहा. असंही आवाहन करण्यात आलं आहे.

        कसं केलं जातं सेलिब्रेशन? (International day of peace 2022 Celebration)--

     या दिवशी संयुक्त राष्ट्रापासून विविध शाळा-महाविद्यालये, संस्था इत्यादींमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शांततेचे दूत म्हटल्या जाणार्‍या पांढऱ्या कबुतरांना उडवलं जातं आणि जगाला शांती आणि बंधुतेचा संदेश दिला जातो. खरे तर गोडवा आणि बंधुभाव हे 'शांतीचे' खास माध्यम आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय संदर्भात, या दिवसाचा मुख्य उद्देश जगात युद्धविराम आणि शांततेचं वातावरण निर्माण करणे हा आहे.

     सर्व देश आणि नागरिकांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हाच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्र संघाने कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट, संगीत या जगातील नामवंत व्यक्तींना 'शांती दूत' म्हणून नियुक्त केले आहे, जे या दिवशी त्यांच्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करतात.

--रोहित गोळे
-------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाईम्स नाऊ मराठी.कॉम)
                  ------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.09.2023-गुरुवार.
=========================================