इतर कविता-क्रमांक-167-अंधाराला छेद्ण्याची गरज आहे…

Started by Atul Kaviraje, November 03, 2023, 06:12:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      इतर कविता 
                                    (क्रमांक-167)
                                   ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "इतर  कविता"  अंतर्गत  मी  इतर  कवींच्या  कविता  आपणापुढे  सादर  करीत आहे .

                            अंधाराला छेद्ण्याची गरज आहे...
                           -----------------------------

आभाळाला भिंती घातल्या आणि मी घरंदाज झालो..
वाट्याला आलेला खिड्की येवढा आभाळाचा तुकडाच माझा अवकाश बनून राहीला..
सुर्याला फुंकर घालुन घरच्या दोन पणत्यामध्ये दिवाळी मानत आलो..
भिंतीवरली सावली फक्त मोठी झाली
बाकी सगळच आक्रसून गेल..
जाणिवा,सन्वेदना,कक्शा आणि काही काही..
नेमक्या चार चांद्ण्याची खिड्कीच जगण्याची चौकट बनली..
एक नियमीत मरण रोज जगन्याची सवय झाली..
त्याचीच भलावण करत राहीलो..
भल्या मोठ्या आभाळाची सवय सुटलेली..
एवढ मोठ तरंगत आभाळ पाहुन,कोसळेल काय वाटायला लागत..
चांदन्यांचा खच पाहुन डोळे गरगरायला लागतात..
समोरच्या चिरंतन अंधारातुन पट्कन कोणी अंगावर येइल काय,वाटायला लागत..
मग पुन्हा चार भिंतीत स्वताला चिणून घेतो..
मी असा का झालो असुरक्शीत,कधी निघणार मी बाहेर? मीच बांधलेल्या थडग्यातून..
खरतर हा आभाळाचा मंडप माझ्यासाठीच आहे ना?
कधी चिमटनार मी आकाशाला?
कधी लिंपणार या चांदण्या मी माझ्या केशात?
क्शितिजावरील सुर्याकडे मान वर करून पह्ताना,कधी फुलणार इंद्रधनुष्य माझ्या डोळ्यात?
मला या चार भिंतीच्या बाहेर पडायला हव..
मखमली अंधाराच्या पलिकडे,खुप प्रेम करणारा हात असेल माझी वाट पाहत..
कदाचित मी प्रेम करण विसरलो आहे...
थोडा हात लाम्ब करुन
अंधाराला छेदण्याची गरज आहे...
कोणी येणार का बरोबर? पहिल्यांदा अंधार अंगावर घेऊ,
मग आकाश लाम्ब नसेल

--नाना पाटेकर
-------------
--संकलक-सुजित बालवडकर
--------------------------

                  (साभार आणि सौजन्य-मराठी कविता.वर्डप्रेस.कॉम)
                 ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.11.2023-शुक्रवार.
=========================================