प्रसिद्धी हवी असते सर्वांना

Started by Atul Kaviraje, November 03, 2023, 06:46:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     सर्वांनाच प्रसिद्धी आवडते, आपले नाव आलेले आवडते. पण त्याचा अतिरेक होऊ नये, या आशयIवरची माझी ही कविता--

                                प्रसिद्धी हवी असते सर्वांना
                               -----------------------

माझे नावं यायला हवे
माझे चित्र झळकायला हवे
जो तो प्रसिद्धीस हपापलेला,
प्रसिद्धी हवी असते ज्याला त्याला

प्रसिद्धी मिळण्याची साऱ्यांनाच खुमारी
विद्यार्थी असो वI तो व्यापारी
मग कितीही कष्ट पडोत,
काहीही करायची त्यांची तयारी

कुठल्याही थराला जाऊन पोचतो
अकारण विनाकारण कामे धरतो
नावासाठी तो कसंही करतो,
एवढं करून नावं मिळवतो ?

पुढे जाणारा खपत नाही
माझेच का नावं नाही ?
द्वेष बुद्धी निर्माण होते,
दुसऱ्याला नीच दाखवत राही

स्पर्धेचे युग हे आजचे
प्रसिद्धीचे जग हे आजचे
जो तो झटतोय नावासाठी,
खपतोय, कष्टतोय फक्त प्रसिद्दीसाठी

प्रत्येकजण नावासाठी हपापलेला का ?
इतकी प्रसिद्धीची लालसा का ?
दुसऱ्यांबद्दलचा इतका तिरस्कार का ?
त्याने मिळतोय पुरस्कार का ?

नाव आज आहे, उद्या नाही
प्रसिद्धी का कायमचीच राही
आजचा दिवस लक्षात राही,
उद्या कोणीही विचारीत नाही

ही हाव नको प्रसिद्धीची
ही लोलुपता नको नावाची
शांत राहून काम करायचे,
सहजच प्रसिद्धी मिळत जाते,
     आपोआपच नाव होत रहIते.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.11.2023-शुक्रवार.
=========================================