वसुबारस-माहिती

Started by Atul Kaviraje, November 09, 2023, 10:18:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "वसुबारस"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.११.२०२३-गुरुवार आहे. आज "वसुबारस" आहे. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून वसुबारसची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे हा अत्यंत साधा विधीपूर्वक करण्याचा हा दिवस आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रींना या वसुबारस आणि दिवाळी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, वसुबारसची माहिती--

     वसुबारसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत . वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी . दिवाळीची चाहूल आणि दिवाळीतील पाच दिवसांमधील हा पहिला दिवस असतो तो म्हणजे च vasu baras 2023 marathi , म्हणजे bach baras चा . तसेच वसुबारसच्या पूजेपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते.

     " दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी " गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या " असे लहान मुलांना किंवा आपण स्वतः लहान असतांना हातात सुरसुंदरी घेऊन ती गोल -गोल ओवाळत म्हणायचो . तुम्हाला आठवतंय का?

     चला तर आठवले असेल तर जाणून घेऊयात कि हि वसुबारस का साजरी केली जाते आणि कशी साजरी करायची तसेच यामागे नेमक्या काय – काय भावना आहेत .

     जेव्हा असुरांमध्ये आणि देवांमध्ये स्पर्धा झाली तेव्हा समुद्र मंथन करण्यात आले. त्या वेळी समुद्र मंथन करत असतांना त्यातून ५ रत्ने बाहेर पडली आणि ह्या रत्नातून पाच गायी बाहेर पडल्या आणि त्यातील एका गायी चे नाव नंदिनी होते . तिचे प्रतीक म्हणून गोबारस साजरी करण्याची प्रथा आहे.

     आणि दुसरं म्हणजे गाई पासून आपल्याला खूप सारे फायदे देखील मिळतात . गायीचे तूप , दूध, दही, ताक तसेच , गाईचे पवित्र आणि गुणकारी गोमूत्र आणि गाईचे शेण हे देखील निसर्गाची देणगीच जणू .

     शेतातील उत्पन्न वाढवण्यासाठी आपण गायी चे शेणखत देखील वापरतो . अश्या बऱ्याच प्रकारचे गायी चे आपल्यावर उपकार असतात . तर त्या बद्दल गायीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हि वसुबारस साजरी करतो.

     तसेच हिंदू धर्मात गाईला खूप महत्व दिले जाते . अजूनही गावो -गावी गायीला देव मानतात. गायी रस्त्याने जरी दिसली तरी तिच्या शेपटीला हात लावून नमस्कार केला जातो. तसेच गायीच्या पोटात ३३ कोटी देव वास करतात असे हि मानले जाते .

     आपल्या भारतातील ह्या आगळ्या वेगळ्या संस्कृती इतर देशांपेक्षा खूपच छान आहेत. जिथे गाईचे पूजन केले जाते. म्हणजेच cow day साजरी केला जातो. जो इतर कोणत्याहि देशात साजरी होत नाही .

     अश्या आपल्या आगळ्या वेगळ्या vasu baras marathi 2023 च्या आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

          वसुबारस दिनांक , वार, 2023--

     ह्या वर्षी महिन्याच्या सुरवातीलाच म्हणजेच वसुबारस 9 नोव्हेंबर , वार गुरुवार 2023 ला आहे . ह्या दिवशी सूर्योदय हा सकाळी ६ वाजून 37 मिनिटांनी आहे. आणि चंद्रोदय हे संध्याकाळी 5 वाजून 58 मिनिटांनी आहे.

         2023 वसुबारस ची पूजा कशी करावी ?--

     वसुबारसच्या दिवशी गाईला आणि तिच्या वासराची अंघोळ घालायची त्यानंतर त्यांना हळद, कुंकू अक्षदा लावावीत आणि आरतीने ओवाळावे , त्यानंतर गाईला आणि वासराला फुलांचा हार घालावा .

     त्यानंतर गाईचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा . आणि गाईसाठी पूरण पोळी खीर किंवा बासुंदी असा गोडाचा नैवद्य करून गाईला तो खाऊ घालावा . अश्या साध्या सोप्या पद्धतीने गाईची पूजा केली जाते. आणि अश्या रीतीने वसुबारस म्हणजेच diwali 2023 vasubaras साजरी केली जाते .

     वसु बारस च्या दुसऱ्या दिवशी धनतेरस असते.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.11.2023-गुरुवार.
=========================================