दिन-विशेष-लेख-धन्वंतरी जयंती

Started by Atul Kaviraje, November 10, 2023, 10:10:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "दिन-विशेष-लेख"
                                      "धन्वंतरी जयंती"
                                    -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-10.11.2023-शुक्रवार आहे. १०-नोव्हेंबर, हा दिवस "धन्वंतरी जयंती" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     धन्वंतरी कोण होते? धनत्रयोदशी दिवशी आयुर्वेद दिवस का साजरा केला जातो ?--

     भारत सरकारने 2015 साल पासून धनतेरस किंवा धनत्रयोदशीचा दिवस हा आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे.
   
     भारतामध्ये दिवाळीचा सण जसा धन धान्य आणि सोने खरेदी करून आर्थिक संपती वाढवण्यासाठी प्रार्थना करण्याचा आहे तसाच तो आरोग्य संपदा वाढवण्यासाठी धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीची (Dhanvantari) पूजा करण्याचा देखील आहे. धन्वंतरी ही आयुर्वेदाची जन्मदाता आणि देव-देवतांचा चिकित्सक होता अशी हिंदू पुराणामध्ये माहिती आहे. त्यामुळे भारत सरकारने 2015 साल पासून धनतेरस किंवा धनत्रयोदशीचा दिवस हा आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. या दिवसाच्या निमित्ताने जगभर आयुर्वेदाचा प्रसार व्हावा, मानवी आरोग्य अधिक सुरक्षित ठेवण्यसाठी पर्यायी उपचार पद्धती म्हणून नेहमीच्या आयुष्यात आयुर्वेदाचा कसा उपयोग होऊ शकतो याबाबत या दिवशी जनजागृती केली जाते. यंदा कोविड आणि आयुर्वेद उपचार पद्धती या थीम वर आधारित भारत सरकार 13 नोव्हेंबर दिवशी आयुर्वेद दिवस 2020 साजरा करणार आहे.

          आयुर्वेदाची देवता धन्वंतरी कोण होते ?--

     आयुर्वेदाची देवता म्हणजेच धन्वंतरी हे भगवान विष्णूंचा 12 वा अवतार समजला जातो. धन्वंतरीची उत्पत्ती ही समुद्रमंथनाच्या वेळेस झाली असा संदर्भ हिंदू पुराण कथांमध्ये सांगितला जातो. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश घेऊन धन्वंतरी बाहेर पडले होते तेव्हा देव आणि असुरांमध्ये या कलशावरून संघर्ष पेटला होता.

     धन्वंतरी हे चारभुजा धारी होते. त्यांच्या एका हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ, एका हातामध्ये औषधी कलश (अमृत कलश), एका हातामध्ये जडी बुटी आणि एका हातामध्ये शंख होता असे मानले जातो. या सार्‍या गोष्टींचा वापर करून मनुष्यजातीला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी उपचार केले जातात असं समजले जाते.

     दरम्यान भारतामध्ये वेदांची निर्मिती झाली असून आयुर्वेद हा त्यामधील पाचवा महत्त्वाचा वेद आहे. दिवाळीच्या निमित्ताने धनतेरसला धन्वंतरीची पूजा करून आयुर्वेदाचे अभ्यासक हा दिवस साजरा करतात. यंदा 13 नोव्हेंबरला भारताचे पंताप्रधान नरेंद्र मोदी आयुर्वेद दिवस 2020 चं औचित्य साधत Institute of Teaching and Research in Ayurveda (ITRA)चं जामनेर मध्ये तर National Institute of Ayurveda (NIA) चं जयपूर मध्ये उद्घाटन करणार आहे.

--सण आणि उत्सव टीम लेटेस्टली
-----------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2023-शुक्रवार.
=========================================