दिन-विशेष-लेख-शिवप्रताप दिन-A

Started by Atul Kaviraje, November 10, 2023, 10:14:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                    "शिवप्रताप दिन"
                                 ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-10.11.2023-शुक्रवार आहे. १०-नोव्हेंबर, हा दिवस "मराठी रंगभूमी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     याच दिवशी म्हणजेच 10 नोव्हेंबर 1659 ला छ. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या संघर्षात शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कंठस्नान घातले होते. या दिवसाची आठवण म्हणून आजही महाराष्ट्रात शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.

     शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) हा पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमान आणि शौर्याचा दिवस आहे. स्वराज्यावर आक्रमण करून आलेला अफजलखान आणि योजना बनवणारा आदिलशाह यांच्यासाठी राजा शिवबा एकटाच पुरेसा होता. अत्यंत युक्तीपूर्ण पद्धतीने आणि प्रसंगावधान राखून अफजलखानाचा केलेला वध उभा महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.

                 शिवप्रताप दिन – Shiv Pratap Din--

        शिवरायांचा प्रतापगडावरील पराक्रम | अफजलखानाचा वध ! Shivaji Maharaj and Afjal Khan History--

     शिवराय स्वराज्य चालवत असल्याची चाहूल विजापूर दरबारी कळली होती. आदिलशाही ताब्यातील अनेक गडकिल्ले शिवाजी महाराज स्वतःच्या ताब्यात घेत होते. त्यामुळे एक दिवस शिवरायांचा बिमोड करायचा म्हणून आदिलशाही दरबारात योजना आखल्या जात होत्या. आदिलशाहीतील सर्व सरदार, बहादुर सेनानी, वजीर सर्वजण उपस्थित होते.

     बडी बेगम त्यावेळी दरबारात उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. "कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त?" सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त आक्रमण करून करणे आणि सह्याद्रीच्या कुशीत जाऊन शिवरायांना ललकारणे तेवढे सोप्पे नव्हते.

     यावर तोडगा म्हणून अफजलखान नावाचा धिप्पाड सरदार पुढे आला. शिवाजीला जिवंत किंवा ठार मारून घेऊन येण्याचे वचन भर दरबारात अफजलखानाने दिले. कारण अफजलखानाची ताकद म्हणजे पोलादी! लोहाची हत्यारे आपल्या हातांनी वाकवणारा असा हा अफजलखान शिवरायांना पकडण्यासाठी स्वराज्यावर आक्रमण करण्यास तयार होतो.

     अफजलखानाला सह्याद्री आणि आसपासचा प्रांत बऱ्यापैकी माहीत होता. राजगडावर असताना शिवरायांना ही बातमी कळली. खानाचा मुकाबला भर युद्धात आपण करू शकत नाही याची जाणीव शिवरायांना होती. शिवरायांचे सैन्य आणि राज्य सध्या लहान होते. त्याचा निभाव खानाच्या फौजेपुढे लागणे शक्य नव्हते.

     अफजल खानाशी मुकाबला हा युक्तीनेच होऊ शकतो हे शिवरायांना समजले होते. कारण अफजल खान मोठे सैन्यबळ घेऊन चालून आला होता. शिवराय त्यांची योजना आखून प्रतापगडावर रवाना होतात. शिवराय प्रतापगडावर गेल्यावर खान चांगलाच चिडला. त्याला भलेमोठे सैन्य प्रतापगडावर नेणे शक्य नव्हते. प्रतापगड डोंगरात वसला असल्याने तिथे पोहचणे म्हणजे चांगलेच अडचणीत आणणारे काम होते.

     शिवाजी महाराज स्वतः उतरून खाली यावे यासाठी खानाने रयतेचा छळ करण्यास सुरुवात केली. असे केल्याने शिवराय खाली येतील असा खानाचा समज खोटा ठरला. मोठा संयम दाखवत शिवाजी महाराजांची ही चाल यशस्वी ठरली. खानाने मग शिवरायांना भेटण्यासाठी संदेश पाठवला.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-डेली मराठी न्युज.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2023-शुक्रवार.
=========================================