दिन-विशेष-लेख-शिवप्रताप दिन-B

Started by Atul Kaviraje, November 10, 2023, 10:16:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                                     "शिवप्रताप दिन"
                                   -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-10.11.2023-शुक्रवार आहे.  १०-नोव्हेंबर, हा दिवस "मराठी रंगभूमी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     "आमचे किल्ले परत द्या आणि आदिलशाहीत सामील व्हा आम्ही तुम्हाला सरदारकी देऊ इच्छितो." असा संदेश शिवरायांना कळताच ते आणखीनच सावध झाले. मोठ्या बुद्धीने परतीचा संदेश म्हणून शिवराय खानास घाबरतात आणि खानाने खुद्द शिवाजींना भेटण्यासाठी प्रतापगडावर यावे असे सांगितले.

     अफजलखान मोठमोठ्याने हसू लागला, "हा शिवाजी तर डरपोक निघाला. आम्ही त्याच्या पराक्रमाच्या ऐकलेल्या कथा खोट्या होत्या, आम्हीच जातो त्याला भेटायला आणि चिरडून टाकतो," असे म्हणत खान "प्रतापगडावर भेटू!" असा संदेश पाठवतो. प्रतापगड येथील खालची माची येथे भेटण्याचा बेत ठरला.

     भेटीच्या वेळी दोघांचेही एक एक अंगरक्षक सोबत असतील आणि बाकीचे अंगरक्षक शामियान्याच्या बाहेर असतील असे ठरले. छान असा शामियाना उभारण्यात आला. भेटीची वेळ ठरवण्यात आली. आपल्याबरोबर काही दगा झाला तर किल्ल्यावरील बाकीचे सैन्य आक्रमण करेल आणि अफजल खान देखील माघारी जाता कामा नये, याची पुरेपूर व्यवस्था शिवाजी महाराज करतात.

     भेटीचा दिवस उजाडला. शिवराय भवानी देवीचे दर्शन घेतात. अंगात चिलखत, डोक्यावर जिरेटोप आणि पट्टा, वाघनखे आणि बिचवा अशी शस्त्रे शिवराय परिधान करत त्यावरून आपला पोशाख चढवतात. सर्व सरदार आणि सेवकांना सूचना देत शिवराय भेटीसाठी तयार झाले. शामियान्यात जिवाजी महाला याला शिवराय सोबत नेण्याचा बेत करतात. अफजलखान बडा सय्यद नामक आपल्या सेवकासोबत बसलेला असतो.

     शिवराय शामियान्याच्या दाराशी येऊन थांबतात. "शिवाजी आत का येत नाही?" असे अफजलखान महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ यांना विचारतात. "शिवाजी राजे बडा सय्यदला घाबरतात", असे उत्तर मिळताच बडा सय्यद थोडा दूर झाला. "या राजे, भेटा आम्हाला." असे म्हणत अफजलखान उभा राहतो.

     अफजलखान शिवरायांना आलिंगन देण्याच्या उद्देशाने पुढे सरकतो. शिवराय त्याचे आलिंगन स्वीकारतात. शिवराय अफजलखानापुढे खूपच लहान होते. त्यांना मिठीत घेऊन चिरडून टाकावे असा मनसुबा खानाचा होता. शिवराय मिठीत येताच त्यांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला. अंगात चिलखत असल्याने शिवराय बचावले. प्रसंगावधान राखून शिवरायांनी वाघनख्या आणि बिचवा काढून अफजलखानाचा पोटळा बाहेर काढला.

     खानाचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे सरसावताच एका पट्ट्याच्या वारातच शिवराय त्यांना ठार करतात. सय्यद आता वार करणार एवढ्यात जिवाजी महालाने त्याला ठार केले. संभाजी कावजी, जिवाजी महाला आणि शिवराय हे तिघे या संघर्षात सहभागी होते. या घटनेनंतर "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.

     शिवरायांनी केलेली विजयी सूचना सगळे मावळे ऐकतात आणि खानाच्या फौजेवर तुटून पडतात. अफजलखानाचा मुलगा फाजलखान या चकमकीत निसटतो आणि विजापूरला पोहचतो. विजापूरच्या दरबारात एवढ्या बलाढ्य सरदाराचा मृत्यू संपूर्णपणे हाहाकार उडवून देतो. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आता सर्वदूर पसरली. स्वराज्याचा राजा शिवछत्रपती म्हणून उदयास येऊ लागला होता.

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-डेली मराठी न्युज.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2023-शुक्रवार.
=========================================