धनत्रयोदशी-माहिती-A

Started by Atul Kaviraje, November 10, 2023, 10:19:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "धनत्रयोदशी"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.११.२०२३-शुक्रवार आहे. आज "धनत्रयोदशी" आहे. दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या अगोदरचा सण म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, धनत्रयोदशीची माहिती.

          धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व--

     दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या अगोदरचा सण म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा आहे. धनत्रयोदशीला अनन्य साधारण महत्व आहे. नेहमी घर संपत्ती व ऐश्वर्याने भरभरून रहावं म्हणून हा सण साजरा केला जातो. त्याच्याबद्दल आपल्या मनात असणारे प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.

          धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व--

     धनत्रयोदशीला सोने, चांदी, नाणे यांची पूजा केली जाते व आपल्या धनसंपत्तीत उत्तरोत्तर वाढ होत जावी, अशी प्रार्थना केली जाते. धनतेरस अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. धन्वंतरी जयंती म्हणजेच धनतेरस. या दिवशी धातूची वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे असे मानले जाते. सोने, चांदीची वस्तू खरेदी केल्याने घरात धन वैभव आणि सुख समृद्धी येते.

     परंतु तुम्ही जर सोने-चांदीचे महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर यावर सुद्धा एक मार्ग आहे. आपण अशा वस्तूंची खरेदी करा की, जाने सोन्या, चांदी एवढाच लाभ होईल जसे की, पितळ, तांबे, झाडू, जवस धने इत्यादी. धनत्रयोदशीला पितळची वस्तू खरेदी केल्याने तेवढाच लाभ आपल्याला होतो. म्हणून सोने, चांदी खरेदी खरेदी करू शकत नसल्यास, पितळ या धातूची वस्तू खरेदी केली तरी चालेल. पितळ हा धातू शुभ मानला जातो. म्हणून पितळेच्या वस्तू खरेदी करून त्याची पूजा केल्यासही लक्ष्मी माता प्रसन्न होते.

           धनत्रयोदशी चे महत्व :--

     धनत्रयोदशी चे महत्व आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवीचा जन्म झाला. धन्वंतरी देवी हे धनाची देवी मानले जाते. म्हणून या दिवशी सोने, चांदी, धन, भांडी यांची सुद्धा पूजा करतात. हिंदूप्रमाणे कार्तिक मास कृष्ण पक्षात धनत्रयोदशी दर वर्षी साजरी करत असतात. या दिवशी उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरीची पूजा स्थापना करून तुपाचा दिवा उत्तर दिशेला लावला जातो. त्याला पांढऱ्या रंगाची आणि धनवंतरी समोर पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य ठेवला जातो.

     घरातील सोन्या-चांदीचे दागिने धान्याची पूजा केली जाते. घराच्या बाहेर राईच्या तेलाचा दिवा लावला जातो. हे करण्यामागे एक महत्त्व आपल्याला दिसून येते, की आपल्या जवळ धनसंपत्ती ऐश्वर्य नेहमी राहावे या उद्देशाने धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते.

           धनत्रयोदशी कशी साजरी करतात :--

     दिवाळीच्या आधीचा दिवस म्हणजेच घरचे रस असते. त्यालाच धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी तेरा दिवे लावून हा सण साजरा केला जातो. तसेच अंगणातही दिवे लावले जातात. देवघरावर विद्युत रोषणाई केली जाते. त्यामागे हाच उद्देश आहे, की सतत आपल्या आयुष्यामध्ये असेच अशाच प्रकारचे रोषणाई राहावी व कुठल्याही प्रकारची आरोग्य हानी न व्हावी म्हणून ही पूजा केली जाते. या संबंधीच्या अडचणी पासून नेहमी दूर रहावे. हा त्यामागचा उद्देश आहे.

     धनतेरसच्या दिवशी सर्वात आधी संध्याकाळी तेरा दिवे प्रज्वलित करून आणि तिजोरीतील कुबेराचे पूजन करतात. नंतर चंदन, धूप, दीप, नैवेद्य याने पूजन झाल्यावर आरती करावी आणि मंत्र, पुष्पांजलीअर्पित करतात. तसेच तेरा दिवे लावत असताना, त्या दिव्याजवळ तेरा कवळ्या ठेवतात. नंतर या कवड्या घरातील एखाद्या कोपऱ्यात दाबून यांनी अचानक धनलाभ होण्याचे योग बनतात. असा त्यामागे उद्देश आहे.

     या दिवशी दिवे घराच्या आत आणि तेरा दिवे घराच्या बाहेर ठेवल्याने घरात दारिद्र आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच कुटुंबातील लोकांसाठी भेट वस्तू, कपडे, इतर वस्तू खरेदी करतात. जर आपल्याकडे धन टिकत नसेल तर पैसा सुद्धा येत नसेल तर या दिवशी धनत्रयोदशीची पूजा करत असतांना साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूचे दान सुद्धा देण्याची प्रथा आहे.

--प्रमोद तपासे
-------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2023-शुक्रवार.
=========================================