धनत्रयोदशी-माहिती-B

Started by Atul Kaviraje, November 10, 2023, 10:21:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "धनत्रयोदशी"
                                    -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.११.२०२३-शुक्रवार आहे. आज "धनत्रयोदशी" आहे. दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या अगोदरचा सण म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, धनत्रयोदशीची माहिती.

     तसेच दारावर येणारे गरजू भिकारी किंवा कोणीही मागणारे आले तर त्याला रिकाम्या हाती पाठवत नसतात. दहा दिवस मोठ्या उत्साहाने व आनंदाने हिंदू महिला साजरा करत असतात. या दिवशी कुठलेही प्रकारचे भांडण न करता मनामध्ये सकारात्मकता ठेवली जाते. आपल्या कामात यश मिळविण्यासाठी इच्छा असलेल्या धनत्रयोदशीच्या दिवशी त्या झाडाची दहाडी तोडावी ज्या झाडावर वटवाघळं बसत असतील, तेथील दहाडी ड्रॉइंग रूममध्ये ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृद्धी होते.

     तसेच धनवंतरी जन्मोत्सव हे आणखीन एक व्रत करण्यात येते. त्या मागे आयुर्वेदाचे प्रवर्तक असलेला विष्णूचा अवतार धन्वंतरी आहे. धन्वंतरी सर्व विद्यात निष्णात होती. मंत्र, तंत्रातही विशारद होती. त्यांच्या अलौकिक प्रतिभेने औषधींचे सारामृत रूपाने देवांना प्राप्त झाले. त्यामुळे त्या देवांचे वैद्य राज हे पद मिळाले. त्यामुळे संध्याकाळी ईशान्य दिशेकडे तोंड करून धनवंतरीची प्रार्थना केली जाते व दीर्घायुष्य मिळण्यासाठी प्रार्थना केली जाते.

            पौराणिक कथा :--

     धनत्रयोदशी या सणामागे एक पौराणिक कथा आपल्याला दिसून येते. ती म्हणजे की, हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असे ऋषी कडून सांगितले होते. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस आहे. त्या रात्री त्यांची पत्नी त्याला झोपू न देण्याचा बेत आखते. त्याच्या अवतीभवती सोन्या, चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात.

     महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या, चांदीने भरून ठेवले होते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला होता. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवले. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव आपल्या यमलोकात परततो. अशाप्रकारे राजकुमार महाराजचा जीव वाचतो.

     म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे ही म्हटले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.

     तसेच धनत्रयोदशीबद्दल आणखीन एक कथा आहे. ती म्हणजे समुद्र मंथन याबद्दलची जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले. तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आली. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते किंवा या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.

--प्रमोद तपासे
-------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीमोल.कॉम)
                      -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2023-शुक्रवार.
=========================================