धनत्रयोदशी-शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, November 10, 2023, 10:25:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "धनत्रयोदशी"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.११.२०२३-शुक्रवार आहे. आज "धनत्रयोदशी" आहे. दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या अगोदरचा सण म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.

     धनत्रयोदशी निमित्त मराठी शुभेच्छा Messages, Images फेसबुक आणि व्हॉट्सअप करा शेअर. या सणानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter, इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता.
   
     धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi) सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी 10.11.2023-शुक्रवार,  धनत्रयोदशी साजरी केली जात आहे.  या दिवशी, लोक देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर - संपत्तीची देवता यांची पूजा करतात, भक्त त्यांचे घर दिवे आणि फुलांनी सजवतात आणि सोने, चांदी, पितळ आणि तांब्याच्या वस्तू, देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश मूर्ती, पितळ, तांबे किंवा यासारख्या शुभ वस्तू खरेदी करतात.

     धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसोबतच ते आपल्या प्रियजनांना या खास दिवशी शुभेच्छाही पाठवतात. जर तुम्ही आणि तुमचे प्रियजन या वर्षी धनत्रयोदशी साजरी करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यासाठी काही शुभेच्छा, प्रतिमा, संदेश, शुभेच्छा आणि कोट्स तयार केले आहेत.

     या संदेशांसह तुमच्या प्रियजनांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.

          धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो

निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो

ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची

आणि भरभराटीची जावो

धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!



दिव्यांची रोषणाई

फराळाचा गोडवा

अनोखी अपूर्वाई

अन् धनत्रयोदशीचा सोहळा!

सर्वांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!



धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी

कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी

फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी

मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी

धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!



आला आला दिवाळीचा सण

घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण

दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी

धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी

धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!



दिवाळीचा हा सण,

तुमच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून

तुमच्यावर सुखाची बरसात करो... हिच इच्छा

धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!
=========================================

--Vrushal Karmarkar
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.लेटेस्टली.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.11.2023-शुक्रवार.
=========================================