कविता मनातल्या-नको व्यर्थ धापा…

Started by Atul Kaviraje, November 11, 2023, 10:12:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   "कविता मनातल्या"
                                  ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया "कविता मनातल्या" या काव्य सदरI अंतर्गत, आयुष्यावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "नको व्यर्थ धापा... "

                                  "नको व्यर्थ धापा... "
                                 -------------------

सेकंदासारखा नको धावूस
असावा संयम तो तासाचा
नको त्या व्यर्थ धापा
कोंडमारा होइल श्वासाचा

तुझ्या जीवनाच्या रथाचा
तूच आहेस रे घोडा
नको आसुड दुसऱ्यांवर
संयम ठेव तू थोडा
नको शर्यत पुढच्याशी
कधीही शिवेल तुला मागचा
नको त्या व्यर्थ धापा
कोंडमारा होइल श्वासाचा

नको ती व्यसने घातकी
मार्ग रे तो र्हासाचा
का घ्यावी व्यर्थ परिक्षा
प्याला रे तो विषाचा
मिळेल त्यात रहावं समाधानी
नको सुर तो निराशेचा
नको त्या व्यर्थ धापा
कोंडमारा होइल श्वासाचा

उगवला तो मावळला
आणि आला तो गेला
तोच खरा जगला ज्याने
मोकळा श्वास घेतला
नको अडकुस बंधनात
गुंता रे तो पाशाचा
नको त्या व्यर्थ धापा
कोंडमारा होइल श्वासाचा

सुख येणार, दूःख जाणार
काही नाही जवळ राहणार
खरं खोटं करता करता
सुंदर तुझं आयुष्य सरणार
नाही तुला उलगडणार कधी
खेळ जीवनाच्या रहस्याचा
नको त्या व्यर्थ धापा
कोंडमारा होइल श्वासाचा

प्रयत्न तू रहा करत
कधी जिंकणार कधी हारणार
काही ठेचांचे घाव ते
नाही रे कधीच भरणार
उघड खिडक्या मनाच्या
आनंद घे तू जीवनाचा
नको त्या व्यर्थ धापा
कोंडमारा होइल श्वासाचा

--डौ. सुभाष कटकदौंड
---------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी कविता मनातल्या.वर्डप्रेस.कॉम)
           -----------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.11.2023-शनिवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================