नरक चतुर्दशी-माहिती

Started by Atul Kaviraje, November 12, 2023, 09:48:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "नरक चतुर्दशी"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.११.२०२३-रविवार आहे. आज "नरक चतुर्दशी" आहे. ही कार्तिक कृष्ण चतुर्दशी आहे आणि तिला नरक चौदस आणि काली चौदस असेही म्हणतात. नरक चतुर्दशी, ज्याला रूप चौदस असेही म्हणतात, दिवाळी महापर्वाच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर स्नान केल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नरक चतुर्दशी वर महत्त्वाची माहिती.

     Diwali 2023: नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. धार्मिक महत्त्व असलेल्या अभ्यंगस्नानाबद्दल अजूनही माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत. हे स्नान नियमित केल्याने विशेष पुण्य लाभ होतो. घरोघरी दर दिवाळी आणि अभ्यंग स्नान हे समीकरण ठरलेलं आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने यमाचे भय नाहीसे होते, असे मानले जाते. अभ्यंगस्नान योग्य वेळी केले तर त्याचे विशेष पुण्य प्राप्त होते. नरक चतुर्दशी दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होते, फटाके फोडले जातात. पौराणिक कथेनुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी राक्षस नरकासुराचा वध केला. नरकासुराच्या तुरुंगात बंदिस्त असलेल्या सोळा हजार शंभर मुलींचीही त्यांनी सुटका केली होती.

     दिवाळी सणाबाबत सर्वांमध्येच उत्साहाचे वातावरण असते. दिवाळी सण धनत्रयोदशीच्या दिवसापासून सुरू होतो जो पाच दिवस असतो. शेवटच्या दिवशी भाऊबीजेने त्याची सांगता होते. नरक चतुर्दशी, ज्याला रूप चौदस असेही म्हणतात, दिवाळी महापर्वाच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर स्नान केल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

     ही कार्तिक कृष्ण चतुर्दशी आहे आणि तिला रूप चौदस, नरक चौदस आणि काली चौदस असेही म्हणतात. चतुर्दशी तिथी ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १:५७ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २:४४ वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदयातिथीनुसार नरक चतुर्दशी १२ नोव्हेंबरलाच साजरी केली जाणार आहे.

    स्नानानंतर दक्षिण दिशेला हात जोडून यमराजाची प्रार्थना केल्यास वर्षभरात केलेली पापे नष्ट होतात, असाही समज आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. धार्मिक महत्त्व असलेल्या अभ्यंगस्नानाबद्दल अजूनही माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत. हे स्नान नियमित केल्याने विशेष पुण्य लाभ होतो.

            अभ्यंगस्नानाचे महत्त्व--

     नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. अभ्यंगस्नानात संपूर्ण शरीरावर तेलाची मालिश केली जाते. ज्योतिषाचार्य पं. चंद्रभूषण व्यास यांच्या मते, अभ्यंग हा दोन शब्दांचा संयोग आहे, अभ्य म्हणजे संपूर्ण (सर्वत्र) आणि अंग म्हणजे शरीर. म्हणजेच संपूर्ण शरीराच्या अवयवांचे आंघोळ. नरक चतुर्दशीला तिळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने अभ्यंग स्नान करता येते. सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. हे स्नान ब्रह्म मुहूर्तावर केले जाते. ब्रह्म मुहूर्ताची वेळ 03:24 मिनिटे ते 04.24 मिनिटे मानली जाते.

           अभ्यंगस्नाचे शरीरासाठी फायदे--

     अभ्यंगस्नानाला जेवढे भौतिक महत्त्व आहे तेवढेच धार्मिक महत्त्व आहे. ज्योतिषाचार्य पं.चंद्रभूषण व्यास सांगतात की, अभ्यंगस्नानाने शरीरातील सर्व छिद्रे उघडतात. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढते. खरे तर दिवाळीचा काळ म्हणजे थंडीच्या आगमनाची वेळ. यावेळी शरीराला हंगामी आजार होण्याची शक्यता असते. अभ्यंगस्नान केल्याने शरीरातील रोगांशी लढण्याची शक्ती वाढते.

--Ramesh Patil
-----------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-न्युज १८ मराठी.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.11.2023-रविवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================