नरक चतुर्दशी-कविता

Started by Atul Kaviraje, November 12, 2023, 09:50:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "नरक चतुर्दशी"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.११.२०२३-रविवार आहे. आज "नरक चतुर्दशी" आहे. ही कार्तिक कृष्ण चतुर्दशी आहे आणि तिला नरक चौदस आणि काली चौदस असेही म्हणतात. नरक चतुर्दशी, ज्याला रूप चौदस असेही म्हणतात, दिवाळी महापर्वाच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर स्नान केल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नरक चतुर्दशी वर एक कविता.

कृष्णाने तरले जसे
सोळा सहस्त्रांना 
पाशातून नरकासुराच्या,
आपले दुःख, दैन्यही 
तयांना तसेच हरावे...

चतुर्दशीच्या सुमुहूर्तावर
आयुष्यात आपुल्या   
नवचैतन्याचे नवकिरण यावे...

--कवी अमर
------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-चित्रकविता.कॉम)
                        -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.11.2023-रविवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================