लक्ष्मीपूजन-माहिती-2

Started by Atul Kaviraje, November 12, 2023, 10:07:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "लक्ष्मीपूजन"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.११.२०२३-रविवार आहे. आज "लक्ष्मीपूजन" आहे. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना लक्ष्मीपूजन आणि दिवाळी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, लक्ष्मीपूजनIवर महत्त्वाची माहिती.

            लक्ष्मी पूजा कशी साजरी केली जाते :--

     लक्ष्मीपूजन हे मोठ्या आनंदात व उत्साहाने करतात. लक्ष्मी पूजन करण्यामागे की, घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व आरोग्य सतत नांदत राहो व अज्ञानाचा नाश होऊ अशी देवीला प्रार्थना करतात. लक्ष्मीपूजन दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी करत असतात. यामध्ये लक्ष्मीची पूजा करून घरासमोर सुशोभीत रांगोळी काढून दारी झेंडूच्या फुलांचे तोरण लावून फराळाला लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावस्या लक्ष्मीपूजन साजरे केले जाते.

     लक्ष्मी पूजन कसे केले जाते, ते आपण पाहूया. बाजारामध्ये मातीची लक्ष्मीची मूर्ती मिळते. ती विकत आणून तसेच पाच मडके सुद्धा पूजनासाठी आणत असतात. त्या छोट्या मडक्‍यांमध्ये लाह्या व बत्ताशेचा प्रसाद आणि वर एक रुपया ठेवतात. असे पाच मडके भरून देवीसमोर ठेवतात. पूजेसाठी श्रीयंत्र गजलक्ष्मी किंवा नारळ-सुपारी खोबरं यांचा विडा असतो. तसेच पैसे आणि पूजेसाठी हळदीकुंकू, अक्षदा, कापूर अगरबत्ती आणि दिवा महत्त्वाचा असतो.

     लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेला फोटोची सुद्धा पूजा केली जाते. आश्‍विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात. त्याच्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

     अश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा सर्व वायूमंडलातील गतिमान होण्यास सुरुवात होताना. घरातील केर, कचरा काढल्यामुळे त्रासदायक घटक वायू मंडळात गतिमान असणाऱ्या त्रासदायक घटक घराच्या बाहेर फेकली जातात. त्यामुळे घराचे पवित्र टिकून राहते. म्हणून आश्‍विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी निस्सारण म्हणजेच रात्री बारा वाजता घरातून केर काढतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. म्हणून व्यापारी वर्गामध्ये लक्ष्मीपूजन मोठ्या थाटामाटाने व उत्साहाने साजरे केले जाते.

            लक्ष्मीपूजन विषयी पौराणिक कथा :--

     लक्ष्मीपूजनI बाबत एक पौराणिक कथा प्रचलित आहे. जेथे स्वच्छता सौंदर्य आनंद उत्साह आहे किंवा सकारात्मकता आहे. तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये श्री सूक्तपाठ केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेर पूजन करण्याची पद्धत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार होता आणि धनसंपत्तीचा स्वामीसुद्धा मानला जातो.

     दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्याचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पुजने हा संस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पण त्याला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेरा बरोबरच लक्ष्मीची ही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत.

     काही मूर्ती कुबेर त्याची पत्नी दाखविण्यात आले आहे. यावरून प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरितिची पूजा केली जात असावी असे मानले जाते. कालांतराने तिचे स्थान लक्ष्मी घेते आणि पुढे गणपतीला केले गेले अशी ही कहाणी आहे.

--प्रमोद तपासे
-------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी मोल.कॉम)
                       ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.11.2023-रविवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================