दिन-विशेष-लेख-लाला लजपतराय पुण्यतिथी

Started by Atul Kaviraje, November 17, 2023, 09:16:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                             "लाला लजपतराय पुण्यतिथी"
                            --------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-17.11.2023-शुक्रवार आहे. १७-नोव्हेंबर, हा दिवस "लाला लजपतराय पुण्यतिथी" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

          लाला लजपतराय यांची संपूर्ण माहिती--

     भारतभूमी ही नेहमी पासूनच वीरांची भूमी आहे. भारताच्या स्वतंत्र लढ्यात असे अनेक वीर होऊन गेलेत ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता बलिदान दिले. असेच एक वीर होते पंजाब चे सिंह लाला लजपतराय. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लाला लाजपत राय हे असे स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आजच्या लेखात आपण लाला लाजपत राय यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

          लाला लजपतराय: प्रारंभिक जीवन परिचय--

     लाला लजपत राय यांच्या जन्म 28 जानेवारी 1865 साली पंजाब मधील मोगा जिल्ह्यात एका जैन परिवारात झाला. त्यांचे वडील लाला राधाकृष्ण अग्रवाल हे प्राध्यापक आणि प्रसिद्ध उर्दू लेखक होते. लाला लाजपत राय यांची लहानपणापासूनच वाचन व लेखनात रूची होती. त्यांनी 1885 मध्ये पंजाबच्या सरकारी कॉलेज मधून वकिली ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि हिसार मध्ये वकिलीचा व्यवसाय सुरू केला.

           लाला लाजपत राय यांचे देशकार्य--

     1897 आणि 1899 मध्ये देशात आलेल्या दुष्काळ पीडितांची त्यांनी तन, मन आणि धनाने सेवा केली. या भूकंप दुष्काळाच्या वेळेस इंग्रजांनी काहीही काम केले नाही. परंतु लाला लजपतराय यांनी स्थानीय लोकांसोबत मिळून अनेक स्थानी लोकांना मदत शिबिर आयोजित केले.

     यानंतर जेव्हा 1905 साली बंगाल चे विभाजन करण्यात आले. तेव्हा लाला लजपत राय यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आणि बिपिनचंद्र पाल यासारख्या देशभक्तां सोबत मिळून या निर्णयाविरुद्ध आंदोलन केले. देशभरात त्यांनी स्वदेशी आंदोलन चालवले. 3 मे 1907 ला रावलपिंडी मधून त्यांना इंग्रजांनी अटक केली आणि सहा महिने मंडाल्याच्या जेल मध्ये ठेवून 11 नोव्हेंबर 1907 ला मुक्त करून दिले.

     यानंतरच्या काळात त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपले आंदोलन अधिक उग्र केले. इंग्रज त्यांच्या लोकप्रियतेला घाबरु लागले. भारताच्या या वास्तविक परिस्थितीचा प्रचार दुसऱ्या देशात करण्यासाठी ते 1914 ला ब्रिटनमध्ये गेले. याच दरम्यान प्रथम विश्व युद्ध सुरू झाले. ज्यामुळे ते परत भारतात येऊ शकले नाहीत. तेव्हा ते ब्रिटनमधून अमेरिकेला गेले. न्यूयॉर्क मध्ये त्यांनी 'यंग इंडिया' पुस्तक लिहिले व इंडियन इन्फॉर्मेशन ब्युरो ची स्थापना केली, याशिवाय दुसरी संस्था होमरूल लीगची स्थापना केली.

     1920 मध्ये प्रथम महायुद्ध संपल्यानंतर ते परत भारतात आले. 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जलियावाला बाग हत्याकांड च्या विरोधात पंजाब मध्ये प्रदर्शन व असह्योग आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. यादरम्यान इंग्रजांनी त्यांना बऱ्याचदा अटक देखील केली.

           सायमन कमिशनचा विरोध व लाला लाजपत राय यांचा मृत्यू--

     30 ऑक्टोबर 1928 ला इंग्लंड चे सुप्रसिद्ध वकील सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक सात सदस्य असलेले आयोग भारतात आले. याचे काम भारतात चर्चेच्या माध्यमाने संविधानिक सुधार करणे हे होते. परंतु या आयोगात एकही भारतीय सदस्य नव्हता. यामुळे भारतीय नेत्यांनद्वारे या कमिशनचा विरोध सुरू झाला. 1929 मध्ये जेव्हा हे कमिशन भारतात आले तेव्हा याचा विरोध मोठ्या प्रमाणात सुरु झाला. सायमन कमिशनच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरून आले. लाला लजपत राय यांनी सुद्धा सायमन कमिशनच्या विरोधात एक मिरवणूक काढली. त्यांच्या नेतृत्वात 'सायमन कमिशन बॅक', 'इन्कलाब जिंदाबाद' अश्या गगनभेदी गर्जनांनी विरोध सुरू झाला.

     जरी ही मिरवणूक घोषणा देत जात होती तरी यात कोणती हिंसा भारतीयांद्वारे होत नव्हती. पण इंग्रजांनी आंदोलकांवर जबरदस्त लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज दरम्यान लाला लजपतराय यांना गंभीर दुखापत झाली, त्यांना डोक्यावर देखील मार बसला. आपल्या शेवटच्या भाषणात ते म्हटले माझ्या "शरीरावर  लागलेला एक एक घाव ब्रिटिश साम्राज्याचा मृत्यूचे कारण असेल". पोलीसांकडून झालेल्या या लाठिचार्ज मुळे 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचा मृत्यू झाला.

     त्यांच्या मृत्यूने भगत सिंह सारख्या देशभक्तांना जागृत केले. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अवघ्या एक महिन्यानंतर 17 डिसेंबर 1928 ला ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉंडर्स याची भगतसिंग व चंद्रशेखर आजाद यांनी गोळी मारून हत्या केली.

--by-Mohit patil
------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================