हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी-स्टेटस-2

Started by Atul Kaviraje, November 17, 2023, 09:32:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                        "हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी"
                       -----------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक १७.११.२०२३-शुक्रवार आहे. आज "हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे" यांची पुण्यतिथी आहे. बाळ केशव ठाकरे यांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार ते पक्षप्रमुख असा प्रवास करणार्‍या बाळ ठाकरेंना कोणतीही सक्रिय राजकारणाची पार्श्वभूमी नव्हती. वडीलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर आपला करिष्मा तयार केला. यंदा त्यांची अकरावी पुण्यतिथी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून, वाचूया काही स्टेटस--

     मा. बाळासाहेबांनसारख्या ज्वलंत विचारांच्या विर पुरषाची या महाराष्ट्राला गरज आहे. ज्या  बाळासाहेबांनी दगडाचे देव केले ते बाळासाहेब  आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. जे बाळासाहेब शरीराने थकले होते. परंतु  विचाराने थकले नव्हते , आजही त्यांचे विचार जे १९६६ साली होते है. आजही तेच आहेत आहे. त्यांनी सांगितले होते ,लाख मेले तरी चालतील ,पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे..!

=========================================
एकदा एका पत्रकाराने बाळासाहेबांना विचारले साहेब तुम्ही jogging का जात नाही..? तर साहेबांनी हसुन त्या पत्रकाराला उत्तर दिले.. मी जर jogging ला गेलो तर Rally निघेल. आणि थांबलो तर सभा भरेल.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

तव स्मरणाने उजडेल पहाट ... पुन्हां  होणे नाही असे हिंदुहृदयसम्राट ,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

"जीवनात एकदा निर्णय घेतला की माझे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही." - बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी साहेब पाहिले ते भाग्यवंत झाले !! हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त त्यांना शतशः अभिवादन !

भगव्याचं तेज इतर कोणत्या झेंड्यात आहे ? भगवा ही आग आहे आग... ...जर वाकडे तिकडे धाडस केल तर जळून खाक व्हाल...हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.

जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरनारे इतिहास रचू शकत नाही.

जगात नाव होण्यासाठी #मोदिंना जगभर फिरावं लागल पण #मुंबईत राहुन जगभर नाव करणारा #एकच #वाघ ते म्हणजे 🚩#हिंदुहृदयसम्राट🚩|| शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ||

हाताचे बळ कधी गेले नाही ,जनतेची साथ कधी सोडली नाही, आज तुम्ही देहानी जरी नसाल मात्र विचारांनी राहाल सदैव आमच्या ह्रदयात .

लढता लढता हरलो जरी , हारल्याची मला खंत नाही, पुन्हां उठेन पुन्हां लढेन , शांत बसायला मी काही संत नाही.

धन्य ती आई जीने जन्म दिलI या बाळाला घेऊनी वसा जनसेवेचा ज्याने पानी केलं स्वतःच्या जीवाचं , ठेऊनी डोळ्यांसमोर शिवाजी राजेच्या स्वराज्याला जन्म दिले ज्यानी या वाघांच्या शिवसेनेला नमन माझा या महापरुषाला

ही मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच असला पाहिजे

वडिलांनी मला मंत्र दिला आहे , ज्योतिषाकडे जाऊ नकोस , कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नकोस , तुझा कुठला ग्रह कुठे बसलाय याची पर्वा करू नकोस , तुझ्याकडे आत्मबल असेल तर , जगाच्या पाठीवर कुठेही जा तुला मरण नाही ,

पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवण्यासाठी माझ्या आदेशाची वाट पाहत बसू नका .

हिंदू धर्माच्या विरोधात कुणी उभं राहील तर , त्याला जळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही

एकजुटीने राहा. जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल.
=========================================

--मराठी भाषण व सूत्रसंचालन
--------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीभाषण.कॉम)
                       -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================