दिन-विशेष-लेख-जागतिक बालदिन-A

Started by Atul Kaviraje, November 20, 2023, 08:41:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "दिन-विशेष-लेख"
                                    "जागतिक बालदिन"
                                   ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-20.11.2023-सोमवार आहे. २०-नोव्हेंबर, हा दिवस "जागतिक बालदिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     जागतिक बालदिन नोव्हेंबर २० ला मानला जातो. बालदिन हा मुलांच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जाणारा एक खास दिवस आहे. १९२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय बाल दिवस पहिल्यांदा जिनेव्हा येथे बाल कल्याणावरील जागतिक परिषदेत घोषित करण्यात आला. १९५० पासून, बहुतेक कम्युनिस्ट आणि पोस्ट-कम्युनिस्ट देशांमध्ये १ जून रोजी साजरा केला जातो.

            बालदिन (Children's Day)--

     बालकदिवस. जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटना जगातील मानवकल्याणासाठी विविध कृतिकार्यक्रम, विशेष दिन राबवून मानवामध्ये जाणीवजागृती करत असते. उदा., जागतिक महिला दिन, एड्स सप्ताह, मानवी हक्क दिन, बालदिन इत्यादी. यांमध्ये एक दिवसापासून ते एक आठवडा, पंधरवडा, पूर्ण वर्ष, दशक इतक्या कालावधीत नियोजित कार्यक्रम साजरे करून समाजपरिवर्तनाचा प्रयत्न केला जातो. या कालावधीत निश्चित कृतिकार्यक्रम करून जाणीवजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.

     २० नोव्हेंबर १९५९ रोजी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद स्वीकारली. त्यामुळे '२० नोव्हेंबर' हा दिवस जागतिक बालदिन म्हणून जगात साजरा केला जातो. २० नोव्हेंबर १९८१ रोजी बालकांच्या हक्कमसुद्यावर सदस्यदेशांनी सह्या केल्या. या सनदेवर आतापर्यंत १९१ राष्ट्रांनी सह्या केल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांचा बालकनिधी (United Nations International Children's Emergency Fund – UNICEF) ही संस्था जागतिक स्तरावर बालकांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणी करत असते. बालदिन जागतिक स्तरावर विविध देशांत वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.

     भारतामध्ये थोर स्वातंत्र्यसेनानी व भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल मोतीलाल नेहरू (Jawaharlal Motilal Nehru) यांच्या १४ नोव्हेंबर या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यचळवळीच्या काळात तुरुंगवास भोगत असताना त्यांनी त्यांची एकुलती एक लाडकी कन्या भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना लिहिलेल्या पत्रांतून बालशिक्षणाबाबत आपले विचार मांडले आहेत. मुले काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षक यांनी पाहिले पाहिजे. त्यांनी मुलांना 'देवाघरची फुलेʼ मानली. ती बागेतल्या फुलांच्या कळीप्रमाणे असतात. त्यांना प्रेमाने व काळजीने हाताळली पाहिजेत; कारण बालकांमध्येच देशाचे भवितव्य दडलेले आहे; देशाची खरी शक्ती व समाजउभारणीचा पाया बालकेच असतात, असे ते म्हणत.

     उद्दिष्टे :- १) बालकांच्या गरजा व हक्क यांविषयी जाणीवजागृती करणे. २) बालकल्याणकारी योजना वाढीस लावणे. ३) बालकांमध्ये सांप्रदायिक व सांस्कृतिक देवाणघेवाण करणे. ४) बालकांमध्ये विविध पंथ वा धर्मांबाबत संहिष्णुता निर्माण करून सामंजस्याची भावना वाढीस लावणे. ५) जगभरातील मुलामुलींमध्ये बंधुभाव वाढीस लावणे. ६) बालकांचे बालपण अधिक समृद्ध बनवणे. ७) बालकांमध्ये 'विश्वकुटुंबाची' संकल्पना वाढीस लावणे.

--Post author:शंकर धनवडे
---------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी विश्वकोश.ऑर्ग)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.11.2023-सोमवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================