दिन-विशेष-लेख-जागतिक टेलिव्हिजन दिवस

Started by Atul Kaviraje, November 21, 2023, 09:34:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                             "जागतिक टेलिव्हिजन दिवस"
                            ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-21.11.2023-मंगळवार आहे. २१ नोव्हेंबर, हा दिवस "जागतिक टेलिव्हिजन दिवस" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

         World Television Day : आज आहे जागतिक टेलिव्हिजन दिवस, जाणून घ्या काय आहे इतिहास--

     टेलिव्हिजनचा (TV) शोध 1927 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन लोगी बेयर्ड (John Logie Baird) यांनी लावला होता. परंतु, त्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूप देण्यासाठी 7 वर्षे लागली आणि 1934 मध्ये टीव्ही पूर्णपणे तयार झाला.

       दूरदर्शन (Television) हे जनसंवादाचे प्रभावी माध्यम आहे. याद्वारे मनोरंजन, शिक्षण, बातम्या आणि राजकारणाशी संबंधित क्रियाकलापांची माहिती मिळते. शिक्षण आणि करमणूक या दोन्हींचा एक उत्तम स्रोत म्हणजे दूरदर्शन. अशा या टेलिव्हिजनचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 21 नोव्हेंबर रोजी जगभरात जागतिक टेलिव्हिजन दिन साजरा केला जातो. जाणून घेऊया या दिनाचा इतिहास (World Television Day History) आणि महत्त्व.

            टीव्हीचा शोध कधी लागला?--

     टेलिव्हिजनचा (TV) शोध 1927 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन लोगी बेयर्ड (John Logie Baird) यांनी लावला होता. परंतु, त्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूप देण्यासाठी 7 वर्षे लागली आणि 1934 मध्ये टीव्ही पूर्णपणे तयार झाला. त्यानंतर 2 वर्षातच अनेक आधुनिक टीव्ही स्टेशन्स सुरू झाली आणि टीव्ही हे लोकांच्या मनोरंजनाचे (Entertainment) साधन बनले. आज जवळपास प्रत्येक घरात टीव्ही बघायला मिळतो. सयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, 2023 पर्यंत टेलिव्हिजनचे असलेल्या कुटुंबाची संख्या अंदाजे 1.73 अब्ज इतकी असेल. तर नेटफ्लिक्स वापरणार्‍या लोकांची संख्या 214 दशलक्ष इतकी असेल. ही आकडेवारी लक्षात घेता डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफार्मला टेलिव्हिजनची बराबरी करण्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे.

            भारतात या वर्षी आले टेलिव्हिजन--

     1934 मध्ये टीव्ही पूर्णपणे तयार झाला त्यानंतर, तब्बल16 वर्षांनंतर म्हणजेच 1950 मध्ये भारतात (India) पहिल्यांदा टीव्ही पोहोचला. एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने प्रदर्शनात दूरदर्शन सादर केले होते. 15 सप्टेंबर 1959 रोजी सरकारी प्रसारक म्हणून दूरदर्शनची स्थापना झाली. दूरदर्शनच्या सुरुवातीला काही काळ कार्यक्रम प्रसारित केले गेले आणि 1965 मध्ये ऑल इंडिया रेडिओचा एक भाग म्हणून नियमित दैनिक प्रसारण सुरू झाले.

           अशी झाली जागतिक टेलिव्हिजन दिनाची सुरुवात--

     संयुक्त राष्ट्र महासभेने 21 नोव्हेंबर हा जागतिक टेलिव्हिजन दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. 21 नोव्हेंबर 1996 रोजी पहिल्या जागतिक टेलिव्हिजन मंचाची स्थापना करण्यात आली आणि यानिमित्ताने जागतिक टेलिव्हिजन दिन साजरा केला जातो. हा मंच स्थापन करण्याचा उद्देश म्हणजे टेलिव्हिजनच्या महत्त्वावर चर्चा करणे हा आहे. या दिवसाचा प्रचार करण्यासाठी लेखक, पत्रकार, ब्लॉगर्स आणि इतर माध्यमातील लोक एकत्र येतात.

--By India.com News Desk
--Edited by Vikas Chavhan
-------------------------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-इंडिया.कॉम)
                        --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.11.2023-मंगळवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================