नेट-भेट-गीत-भेट-51-अरे कृष्णा अरे कान्हा

Started by Atul Kaviraje, November 22, 2023, 09:06:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "नेट-भेट"
                                      गीत-भेट-51
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "नेट-भेट" च्या अंतर्गत आज पाहूया आणि एका सुंदर आणि प्रसिद्ध गाण्याची भेट. या गाण्याचे बोल आहेत- "अरे कृष्णा अरे कान्हा"

                                "अरे कृष्णा अरे कान्हा"
                               ---------------------

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे
प्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगच नाडावे
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेची ओढावी

सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

सद्‌गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दीवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी म्हणे हरी हा भक्तची ओळखावा
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना

============
गीतकार-संत एकनाथ
संगीतकार-शाहीर साबळे
गायक -शाहीर साबळे
============

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी सॉंग्स.नेटभेट.कॉम)
                 -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.11.2023-बुधवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================