दिन-विशेष-लेख-संस्कृती एकता दिन-B

Started by Atul Kaviraje, November 23, 2023, 08:24:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                 "संस्कृती एकता दिन"
                                --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

          आज दिनांक-23.11.2023-गुरुवार आहे. २३-नोव्हेंबर, हा दिवस "संस्कृती एकता दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे वाचक ग्रंथ वाचनापासून दुरावत का गेला? वाचन संस्कृतीचा लोप का झाला? या विधानांची चर्चा करताना वर उल्लेखलेल्या आधुनिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव तर परिकणामकारक आहेच पण याशिवाय आणखीही काही कारणे आहेत. पूर्वी करमणुकीच्या साधनांचा अभाव असल्यामूळे लोक फावल्या वेळेत ग्रंथवाचनाकडे वळत. मात्र सध्या करमणुकीच्या साधनाचा विकास झाला आहे. टी.व्ही. चॅनेल्सच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना घरबसल्या जगाच्या कान्याकोपर्‍%यातली कोणत्याही विषयाची माहिती अत्यंत थोडक्या वेळात आणि परिणामकारक रीतीने मिळू लागली आहे. इंटरनेटवर 'गुगल'सारख्या सर्च इंजिनद्वारे घरबसल्या कोणत्याही विषयावरील माहिती काही सेकंदात मिळते. .आणि बघता बघता सारा समाज गुगलमय होत चालला आहे. तेव्हा तो ग्रंथालयात जाऊन पुस्तकांची शोधाशोध करीलच कशासाठी? हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याची समाजाची वृत्ती कधीच नसते. कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी श्रमात एखादी गोष्ट मिळत असेल तर ती आजच्या फास्ट जगात कुणालाच नको असते. या सर्व गोष्टींच्या परिणामांमुळे वाचक वर्ग कमी होत चालला आहे. फेसबुक, व्हॉट्‌स‍ॲप ट्विटरर या प्रसार माध्यमांवर लोकांचा जास्त वेळ जात असल्याने वाचक वर्ग कमी होत चालला आहे.

     वाचन संस्कृतीचा लोप होत आहे, असे म्हणताना लेखक-प्रकाशकांचीही काही नैतिक जबाबदारी असतेच. काळ बदलत चालला आहे. काळाच्या बदलत्या प्रवाहाबरोबर लेखक-प्रकाशकांनीही बदलायला हवे.सध्या इंटरनेट सारख्या माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर करून वाचन संस्कृती वाढवता येईल. इंटरनेट आदी गोष्टी हे वाचन संस्कृतीवर आक्रमण न मानता ती वाचन व्यवहाराला लाभलेली देणगी आहे या भावनेने तिचा वापर करून घेता येऊ शकेल. कारण ह्या आधुनिक प्रसार माध्यमाद्वारे गद्य-पद्य स्वरूपातील साहित्य, चित्रे, अनुदिनी(ब्लॉग) प्रसिद्ध करता येईती.या दृष्टीने ही माध्यमे उपयुक्त ठरतील. मराठीत ई-साहित्य प्रतिष्ठान या संस्थेने पीडीएफ स्वरूपात मराठी पुस्तके विनामूल्य त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ती पुस्तके आपण डाऊनलोड करून आपल्या मोबाईलवर वाचू शकतो. पुस्तकांचा संग्रहही करू शकतो. इंटरनेट हे माध्यम पुस्तक प्रकाशनापेक्षा स्वस्त, जलद आणि प्रभावी माध्यम आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध केलेले साहित्य काही मिनिटात जगभरच्या वाचकांना उपलब्ध होऊ शकते. त्यावर चर्चा ,विचार, परिसंवाद करणे सहज शक्य होते. व्हॉट्‌स‍ॲपसारख्या प्रसारमाध्यमाद्वारे आपण पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांचे आदान प्रधान करू शकतो. ही प्रक्रिया फार जलद गतीने करता येते.

                     हिंदू संस्कृतीचे अन्य विषय--

          हिंदू संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.-

१. ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्त्वाचे संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.
२. आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य, गृहस्थ ,वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.
३. पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतीशास्त्राच्या दृष्टीने याला विशेष महत्त्वव आहे.
४. चातुर्वर्ण्य-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .
५. प्रतीक संकल्पना- स्वस्तिक, कमळ, कलश ,यज्ञ अशी विविध प्रतीके ही भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत.

            संस्कृतीची अंगे--

१. भूमी
२. भारतीय जन
३. भाषा व साहित्य

     ही भारतीय संस्कृतीची तीन प्रमुख अंगे आहेत.

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकिपीडिया.ऑर्ग)
                       ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.11.2023-गुरुवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================