२४-नोव्हेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:31:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२४.११.२०२३-शुक्रवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिनविशेष"

                                 "२४-नोव्हेंबर-दिनविशेष"
                                -----------------------

-: दिनविशेष :-
२४ नोव्हेंबर
उत्क्रांती दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२०००
भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
१९९८
समाजसेविकांना दिला जाणारा 'अहल्यादेवी होळकर पुरस्कार' आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना
१९९६
इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा 'आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार' ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर
१९९२
कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर
१९९२
वैज्ञानिक संशोधनासाठीचा 'जी. डी. बिर्ला पुरस्कार' हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर
१९४४
दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१८५९
चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ 'ओरिजिन ऑफ द स्पिशिज' प्रकाशित केला.
१७५०
महाराणी ताराबाईंनी छत्रपती राजारामास कैद केले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६१
अरुंधती रॉय – लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या
१९५५
इयान बोथॅम – इंग्लंडचा क्रिकेटपटू
१९१४
लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली.
(मृत्यू: २५ एप्रिल २००३)
१८९४
हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू
(मृत्यू: २२ जानेवारी १९७८)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००४
आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार
(जन्म: ५ एप्रिल १९२०)
२००३
उमा देवी खत्री उर्फ 'टुन टुन' – अभिनेत्री व गायिका
(जन्म: १ जानेवारी १९२३)
१९६३
ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी
(जन्म: १८ आक्टोबर १९३९)
१९६३
मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३). मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.
(जन्म: १० जानेवारी १९००)
१६७५
गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.
(१ एप्रिल १६२१)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================