दिन-विशेष-लेख-उत्क्रांती दिन-E

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:46:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                                    "उत्क्रांती दिन"
                                 -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.11.2023-शुक्रवार आहे. २४ नोव्हेंबर, हा  दिवस "उत्क्रांती दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत--(लेख क्रमांक-३)

             कृत्रिम निवड--

     प्राणी आणि वनस्पती संकरक, नवीन प्रकार निर्माण करण्यासाठी नैसर्गिक निवडीसारखेच निकष वापरतात. सामान्यपणे संकरक, स्वतंत्र जीवामध्ये एखाद्या जातीची चांगली लक्षणे संकर करून त्या जीवात बदल घडवून आणतात. याला 'कुत्रिम निवड' म्हणतात. उदा., कुत्र्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आकार, रंग, वर्तणूक इत्यांदीमध्ये फरक आढळतो. मात्र ते एका मूळ जातींपासून निर्माण झाले आहेत आणि वेगवेगळ्या लक्षणांसाठी त्यांचे संकर केले आहेत. कृत्रिम निवड नैसर्गिक निवडीहून वेगळी असते; प्रजननात कोणते वैशिष्ट्य एका बाबतीत उपयुक्त ठरेल, हे मनुष्य ठरवितो.

             इतर वैज्ञानिक क्षेत्रांचे सहकार्य--

     उत्क्रांती प्रक्रियांचा अभ्यास करताना विविध क्षेत्रातील माहिती उपयोगात येते. विशेषकरुन रेणवीय जीवविज्ञान. या शाखेत उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून जनुकीय प्रक्रियांसंबंधी झालेले संशोधन उपयुक्त ठरले. १९४० साली गुणासूत्रांतील 'डीएनए' ( डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक ) आनुवंशिक माहिती वाहून नेतात, हे समजले. १९५०-६० या काळात डीएनएच्या रेणुसूत्राबाबत संशोधन झाले आणि उत्क्रांतीय बदलांमधील त्याची भूमिका स्पष्ट झाली. रेणवीय पातळीवर डीएनएमध्ये बदल झाल्यामुळे उत्क्रांती घडून येते, याची डीएनएच्या अभ्यासातून वैज्ञानिकांची खात्री पटली.

     १९६० आणि १९७० च्या दशकात, रेणवीय जीववैज्ञानिकांनी डीएनए रेणूंमधील शर्करा आणि फॉस्फेट गटांचा क्रम निश्चित ठरविण्याची पद्धत विकसित केली. जनुकांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की एखाद्या जातीचा संपूर्ण जनुकसंकोष (जीनपूल) लक्षात घेतला तर सजीवा-सजीवांमध्ये मोठ्या प्रमाणात जनुकीय फरक आढळतात. यावरुन वैज्ञानिकांच्या लक्षात आले की निसर्गात उत्क्रांती ज्यातून उद्भवते ती कच्ची सामुग्री म्हणजेच जनुकीय विविधता.

     याच दरम्यान, रेणवीय जीववैज्ञानिकांनी वेगवेगळ्या जातींमधील जनुकांची तुलना करण्याचे तंत्र शोधले, या तुलनेमुळे वैज्ञानिकांना जातींच्या उत्क्रांतीचा नेमका इतिहास माहीत झाला. उदा., जायंटा पंडा हा प्राणी रॅकून किंवा अस्वल यांच्या जवळचा आहे, हे ठाऊक नव्हते; परंतु डीएनए विश्लेषणातून जायंटा पंडा अस्वलाजवळ आहे. हे निश्चित कळले.

     १९९० च्या सुमारास, रेणवीय वैज्ञानिकांनी काही जीवाश्मांमधून थोडेसे डीएनए मिळविले. त्यामुळे इतिहासपूर्व काळातील जनुकांचा अभ्यास प्रयोगशाळेत करणे शक्य झाले. जेव्हा त्यांनी नीअँडर्थल मानवाचे डीएनए आणि आधुनिक मानवाचे डीएनए यांची तुलना केली तेव्हा आधुनिक काळातील कोणत्याही दोन मानवी लोकसंख्येच्या डीएनएमधील भेदाच्या तुलनेत नीअँडर्थल मानवाच्या आणि आधुनिक मानवाच्या डीएनएमधील भेद लक्षणीय होता. यावरून आधुनिक काळातील सर्व मानवजाती जनुकीय दृष्टया एकमेकांशी संबंधित आहेत, हे स्पष्ट झाले आहे. वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती यांच्यात विकासाच्या मूलभूत बाबींचे नियंत्रण काही मोजक्या जनुकांमार्फत होते, हे लक्षात आले आहे. या बाबींमध्ये मनुष्य तसेच कृमी यांसारख्या भिन्न प्राण्यांच्या शरीरखंडाचा समावेश आहे. या निरीक्षणातून बहुतेक जातींच्या समान पूर्वजांमध्ये वर उल्लेख केलेली जनुके आधीपासून असावीत आणि ती जनुके प्रदीर्घ कालावधीनंतर तशीच राहिली असावीत, असा निष्कर्ष आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत आता अतिशय भक्कम वैज्ञानिक पडताळ्याच्या पायावर उभा आहे आणि तो जीवशास्त्रातील सर्वांत मौलिक संबोध मानला जातो.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकास पीडिया.इन)
                      -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================