दिन-विशेष-लेख-तुळशी विवाह

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:49:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                                    "तुळशी विवाह"
                                  -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-24.11.2023-शुक्रवार आहे. २४ नोव्हेंबर, आज "तुळशी विवाह" आहे. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व. 

     शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. शरीरातील ऊर्जा व वीर्यशक्ती कमी झालेली असते, याचेच भान ठेवून चातुर्मासातील व्रत-वैकल्यांची मांडणी केलेली दिसते. म्हणूनच या कालखंडात विवाहासारखे विधी टाळले जातात. आजपासून तुळशी विवाहाला सुरूवात होते आहे, तसेच आज चातुर्मासाची समाप्तीही आहे.

       तुळशीचं लग्न लावण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या तुळशी विवाहाची संपूर्ण विधी--

     गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी आहे आणि २४ ला चातुर्मास संपतो आहे. यानंतर तुलसी विवाहासह सर्व लग्नकार्य, मुंडण, बारसं यासह सर्व शुभ कार्य सुरू होतात. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. यंदा २४ नोव्हेंबर २०२३ रोजी तुलसी विवाह प्रारंभ होत आहे. जाणून घेऊया तुलसी विवाहाची संपूर्ण विधी.

     दिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुलसीच्या लग्नाचे. प्रत्येकाची जगण्यासाठी रोजची धावपळ सुरूच असते. मग त्यात चिंता, व्यथा या तर नेहमीच्याच असतात. दिनक्रमामधील धावपळ, दगदग, ताणतणाव यांनी व्यापलेल्या आयुष्यात हे सण मनाला उभारी देतात. त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा, असा संदेश देणारा आणि मग ती संपली की लगबग सुरू होते ती तुलसीच्या लग्नाची. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. यंदा २४ नोव्हेंबर २०२३ रोजी तुलसी विवाह प्रारंभ होत आहे.

            कन्यादानाचे पुण्य--

     कार्तिकी एकादशीला सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा सायंकाळी करतात.

     दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते. घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते. तुळशी वृंदावन, तसेच कुंडी रंगवून त्यावर राधा-दामोदरचे चित्र काढण्यात येते. फ्लॅट संस्कृतीत अनेकांनी तुळशीला आपल्या बाल्कनीत जागा दिली असून त्या ठिकाणीच लग्नाची तयारी केली जातेय. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवा. तुळशी विवाहाला तुम्हाला तुमचे अंगण आकर्षक रांगोळ्यांनी सजवायचे असेल, तर छान रांगोळीही काढण्यात येते.

            ​गौरीप्रमाणे पूजा--

     प्रत्येकजण आवडी प्रमाणे आणि हौस म्हणून तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात. तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येते. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरतात. तुळशीला नैवद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार केले जातात.

           ​तुलसी विवाहाची पूर्वापार पद्धत--

     लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुलसीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवावी, यजमानाने म्हणजे श्रीकृष्णाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसनावर बसवावे.

     गोरज मुहूर्तावर वराचे पूजन करावे. तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. कारण, पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. त्यांनी असे का केले याचे उत्तर ब्रह्मवैवर्त पुराणातील कथेत मिळते.

--By प्रियंका वाणी
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाईम्स.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================