कविता मनातल्या-चुकांच्या खुणा

Started by Atul Kaviraje, November 24, 2023, 09:57:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "कविता मनातल्या"
                                    ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया "कविता मनातल्या" या काव्य सदरI अंतर्गत, जीवनावर एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "चुकांच्या खुणा"

                                    "चुकांच्या खुणा"
                                   ---------------

फाजिल आत्मविश्वासाने
गणित होते ते चुकले
थोड्याश्या अंतराने
मग यश होते हुकले

निराश झाले होते थोडे
प्रयत्न ते झटलेले
पण झालेल्या चुकांना
मनाने होते जाणले

माझ्या त्या चुकांना मी
मनाच्या हातांनी पुसले
काही कण होते मात्र
मनावर माझ्या रुतले

अपयशाचे शल्य
मनाला होते टोचले
पण माझ्या चुकांसाठी मी
नाही नशिबाला कोसले

चुकांच्या त्या खुणांना
नव्हते मी मिटवले
धार धार त्या कणांना
अलगद बाजूला ठेवले

जुन्या त्या अहंकाराला
नाही पुन्हा जवळ ओढले
चुकांच्या खुणा जाणवत
मी प्रयत्न पुन्हा जोडले

काळाने मन ते माझे
पुन्हा पुन्हा धुतले
पण चुकांच्या व्रणांना
मी जाणिवपूर्वक जपले

आशेने उमेदी सोबत
पाउल पुढे टाकले
जीवनाच्या प्रवासात
निर्धार पुन्हा कामी आले

आत्मविश्वासाच्या स्पर्शाने
यश ते पुन्हा हसले
चुकांच्या खुणांचे मी
कायम आभार मानले

--डौ. सुभाष कटकदौंड
---------------------

            (साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी कविता मनातल्या.वर्डप्रेस.कॉम)
           -----------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2023-शुक्रवार.
=========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
=========================================