दिन-विशेष-लेख-जागतिक विकलांग दिन-B

Started by Atul Kaviraje, December 03, 2023, 09:34:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                    "दिन-विशेष-लेख"
                                "जागतिक विकलांग दिन"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-03.12.2023-रविवार आहे.  ३ डिसेंबर, हा दिवस "जागतिक विकलांग दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

   World Disabled Day; जागतिक दिव्यांग दिन आजच का साजरा केला जातो ?--

     आज जागतिक दिव्यांग दिन. हा दिवस दरवर्षी ३ डिसेंबर १९९२ पासून जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने १९८३ ते १९९२ हे दशक अपंगासाठी अर्पण करण्यात आले होते.आज जगातील दहा टक्के लोकसंख्या, म्हणजेच सुमारे ६७ कोटी लोक या ना त्या रूपाने अपंग आहेत. जागतिक आरोग्य संघटनादेखील अपंग बांधवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्नशील असते. त्यासाठी विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम हाती घेतले जातात.

           जाणून घ्या, दिव्यांग दिनाचा इतिहास --

     बेल्जियम या देशांमध्ये जगातल्या सर्वात मोठया कोळशाच्या खाणीत रविवार दि. २० सप्टेंबर १९५९ रोजी भीषण स्फोट झाल्याने हजारो लोक मृत्यूमुखी झाले, गाडले गेले तसेच हजारो जखमीही झाले. त्यात कित्येक मजुरांचे हात, पाय तुटले तर काहीतर राखेच्या धुरामुळे अनेक अंध तर आवाजामुळे असंख्य कायमचे कर्णबधीर झाले.

     बेल्जियम देशातील कोळशाच्या खाणीत जे मृत्युमुखी झाले. त्यांच्या वारसाला नियमानुसार नुकसान भरपाई मिळाली परंतु ज्यांना कायमचे वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांगत्व आले अशा हजारो मजुरांना मात्र काहीच आर्थिक व इतर मदत न मिळाल्याने संताप निर्माण झाला. बेल्जियम सरकार आणि कोळशाच्या खाणी मालकाच्या विरोधामध्ये दिव्यांगत्व आलेल्या मजुरांना आर्थिक मदतीबरोबर इतर सोयी सवलती मिळाव्यात यासाठी मोठे आंदोलन उभे राहिले.

     दिव्यांगांच्या प्रश्नावर उभ्या राहिलेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. बेल्जियम सरकार आणि कोळसा खाणी मालकाने दखल घेत अपघातात अंध, कर्णबधीर तसेच अपंगत्व आलेल्या हजारो आंदोलकांना योग्य तो आर्थिक मोबदला देत त्याबरोबरच अपघात विमा इतर मागण्या मान्य करण्यात आल्या. या दिव्यांग दिनाची या दिवसाची एक आठवण संयुक्त राष्ट्र संघटनेने सन १९६२ या वर्षापासून मार्च महिन्यातील तिसरा रविवार हा जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याचे ठरविले.

     १९६२ पासून जगभरात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येऊ लागला. त्यानंतर जगभरात दिव्यांगांच्या संघटना निर्माण होऊन अपंग व्यक्तींनी स्वतःच्या हक्क व अधिकारासाठी आंदोलने करण्यास सुरुवात केली. जगातले सर्व देशातील अपंग एकत्र झाले सर्वच देशांमध्ये दिव्यांगांसाठी विविध योजना, कायदे असावेत. यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) सन १९८१ हे वर्ष जागतिक दिव्यांग वर्ष म्हणून साजरे करण्याचे जाहीर करत १९८३ ते १९९२ हे दशक दिव्यांगांसाठी अर्पण केले.

     भारतामध्ये सन १९९१ रोजी राष्ट्रीय दिव्यांग पुनर्वसन परिषद कायदा तयार करण्यात आला. यानुसार अपंग व त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, संघटना व सरकारसाठी काही नियमावली करण्यात आली. जागतिक दिव्यांग दिन मार्च महिन्यातील तिसऱ्या रविवारी ऐवजी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच दिवस असावा म्हणून १९९२ रोजी संयुक्त राष्ट्र संघटना व जागतिक आरोग्य संघटना यांनी ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग व्यक्तीबद्दल सामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने म्हणून साजरा करण्याचे ठरविले.

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकशाही.कॉम)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक--03.12.2023-रविवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================