दिन-विशेष-लेख-डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन-B

Started by Atul Kaviraje, December 06, 2023, 10:10:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                    "डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन"
                   -----------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-06.12.2023-बुधवार आहे. 06 डिसेंबर, हा दिवस "डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्त्व' मानतात.

     महापरिनिर्वाण दिन: बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या १० गोष्टी जाणून घ्या, गर्वाने म्हणाल 'जय भीम'

           Dr Bhimrao Ambedkar--

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते आणि त्यांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आवाज उठविला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्याबद्दलच्या १० महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

            हायलाइट्स:--

--६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन.
--१४ एप्रिल १८९१ रोजी झाला जन्म.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी ६ डिसेंबर रोजी भारतात साजरी केली जाते, ज्याला महापरिनिर्वाण दिवस असेही म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते आणि त्यांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आवाज उठविला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्याबद्दलच्या १० महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ते त्याच्या पालकांचे १४ वे आणि शेवटचे अपत्य होते. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ सुभेदार मेजर होते. सुभेदार मेजर हे ब्रिटिश राजवटीत भारतीयांसाठी सर्वोच्च पद होते.

२) बी आर आंबेडकर यांचे मूळ नाव आंबवडेकर होते. पण त्यांचे गुरू आणि शिक्षकांनी प्रेमाने त्यांचे आडनाव बदलून 'आंबेडकर' ठेवले.

३) वयाच्या १५ व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह नऊ वर्षांच्या रमाबाईशी झाला.

४)आंबेडकर मॅट्रिक पास होणारे पहिले दलित होते. त्याचबरोबर परदेशात अर्थशास्त्रात डॉक्टरेट करणारे ते पहिले भारतीय होते.

५) बी.आर. आंबेडकर यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात दोन वर्षे प्राचार्यपदही भूषवले.

६) भारतीय राज्यघटनेच्या कलम ३७० चा मसुदा तयार करण्यास नकार दिला होता. हे कलम ३७० जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देते.

७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १९४७ मध्ये पहिले कायदा व न्याय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिला हक्क विधेयक फेटाळल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मध्य प्रदेश आणि बिहारच्या विभाजनाची कल्पना सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. त्यानंतर १९१२ मध्ये राज्यांची निर्मिती झाली.

८) १९४२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या ७ व्या सत्रात आंबेडकरांनी भारतातील कामाचे तास १४ तासांवरून ८ तास केले.

९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५-३६ मध्ये 'वेटिंग फॉर अ व्हिसाचे' नावाचे २० पानांचे आत्मचरित्र लिहिले. हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठाने पाठ्यपुस्तक म्हणून वापरले आहे.

१०) आपल्या मृत्यूच्या तीन दिवस आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे हस्तलिखित पूर्ण केले. आंबेडकरांना मधुमेहाचा गंभीर आजार होता. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले.

--By प्रविण दाभोळकर
---------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.12.2023-बुधवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================