०७-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 07, 2023, 09:59:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.१२.२०२३-गुरुवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                 "०७-डिसेंबर-दिनविशेष"
                                -----------------------

-: दिनविशेष :-
०७ डिसेंबर
भारतीय सेना ध्वज दिन
International Civil Aviation Day
========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९८
७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड
१९९५
फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन 'इन्सॅट-२सी' या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
१९९४
कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर
१९८८
यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
१९७५
इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
१९४१
Pearl Harbour Bombing
दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी बॉम्बहल्ला केला.
१९३५
धर्मात्मा
'प्रभात'चा 'धर्मात्मा' हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपट मुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रभात व बालगंधर्व यांनी 'बालगंधर्व-प्रभात' या संयुक्त बॅनरखाली बनवला होता.
१९१७
पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
१८५६
भारतातील पहिला उच्‍चवर्णीय विधवा विवाह कोलकत्त्यात संपन्न झाला.
१८२५
बाष्पशक्तीवर चालणारे 'एंटरप्राईज' नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.
========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५७
जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९२१
प्रमुख स्वामी महाराज – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू
(मृत्यू: १३ ऑगस्ट २०१६)
१९०२
जनार्दन ग्यानोबा तथा 'जे. जी.' नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक
(मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)
========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१३
विनय आपटे
विनय आपटे – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमीवरील मातब्बर कलाकार
(जन्म: १७ जून १९५१)
१९९७
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन
(जन्म: १६ जुलै १९१३ - अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)
१९८२
बाबूराव विजापुरे – नाटककार, संगीतशिक्षक, भरत नाट्य मंदिरचे कार्यवाह
(जन्म: १७ जून १९०३)
१९७६
डॉ. गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ
(जन्म: ? ? ????)
१९४१
भा. रा. तांबे
भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी
(जन्म: २७ आक्टोबर १८७४)
========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2023-गुरुवार. 
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================