दिन-विशेष-लेख-भारतीय सेना ध्वज दिन-B

Started by Atul Kaviraje, December 07, 2023, 10:13:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   "दिन-विशेष-लेख"
                                "भारतीय सेना ध्वज दिन"
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-07.12.2023-गुरुवार आहे. ७ डिसेंबर, हा दिवस "भारतीय सेना ध्वज दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत. र्गत.

        आज भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन, साजरा करण्यामागचं कारण काय ?--

         Indian Armed Forces Flag Day :--

     'भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन' हा दिवस देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समर्पित आहे.

     आज भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन (Indian Armed Forces Flag Day) आहे. हा दिवस शहीदांच्या आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 7 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या देशातील सर्व सैनिकांना समर्पित आहे. देशबांधव या दिवशी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सैनिक, नौसैनिक आणि वायू सैनिकांचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्याची परंपरा आहे.

     सशस्त्र सेनेच्या तीन शाखा म्हणजेच, भारतीय सैन्य दल, भारतीय वायू सेना आणि भारतीय नौसेना यांच्यावतीने राष्ट्रीय सुरक्षे प्रति आपल्या प्रयत्नांचं प्रदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. सैनिक म्हणजे, कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असतात आणि देशाला सुरक्षित आणि अखंड ठेवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका निभावतात.

     दरवर्षी 7 डिसेंबरला 'भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन' साजरा करण्यात येतो. परंतु, अनेक लोकांना याचं कारण माहित आणि इतिहास माहित नसेल. यासंदर्भात इतिहास आणि अधिक माहिती जाणून घ्या...

            भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनाचा इतिहास--

     28 ऑगस्ट, 1949 मध्ये भारताच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्त्वात एक समिती तयार करण्यात आली होती. समितीने निर्णय घेतला की, ध्वज दिन दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येईल. नागरिकांमध्ये लहान झेंड्यांचं वितरण करून त्या बदल्यात सैनिकांसाठी निधी जमा करणं हा भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यामागील मूळ हेतू होता. देशासाठी लढणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांच्या कुटुंबांची काळजी घेणे ही भारतातील नागरिकांची जबाबदारी आहे, असे मानल्यामुळे ध्वज दिनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले.

     7 डिसेंबर या दिवशी देशातील जनता आणि इतर सामाजिक संस्था ध्वज वाटप करुन निधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या आणि मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज आणि विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा करते. निधी देणाऱ्यांना लाल, आकाशी आणि गडद निळ्या रंगांमध्ये असलेले छोटे ध्वज वाटले जातात. हे ध्वज हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड आणि केंद्रीय सैनिक बोर्ड या सशस्त्र दलांचे प्रतिक आहेत.

--By: abp majha web team
--Edited By: स्नेहल पावनाक
-------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी. abp लाईव्ह.कॉम)
                 -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2023-गुरुवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================