दिन-विशेष-लेख-संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती-A

Started by Atul Kaviraje, December 08, 2023, 09:52:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "दिन-विशेष-लेख"
                      "संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती"
                    -------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

    आज दिनांक-08.12.2023-शुक्रवार आहे. 0८ डिसेंबर, हा दिवस "संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या तील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले.

              श्री संत संताजी जगनाडे यांची संपूर्ण माहिती--

         संत संताजी जगनाडे--

     (अंदाजे इ.स. १६२४ – इ.स. १६८८) हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते.

             बालपण--

     संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या तील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चवदा टाळकऱ्या पैकी एक झाले.

             विवाह--

     संताजींचा शिक्षण तसे फक्त हिशोब करण्यापुरतेच झाले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्यास सुरवात केली. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती त्यामुळे संत संताजी महाराजांचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. आणि आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावरच लागले. त्याच बरोबर त्यांना जसा वेळ मिळेल त्यानुसार भजनाला कीर्तनाला ही जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते.

             गुरुभेट--

     त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजीना दिले होते. परंतु तुकाराम हे संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्य संस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्याचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झIकला गेला.

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-संत महंत.इन)
                      ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2023-शुक्रवार.
========================================

CHECK OUT MY SOCIALS -

INSTAGRAM - https://instagram.com/atul_chya_kavita
PINTEREST - https://www.pinterest.com/chyakavitaatul55/
TWITTER(X)- https://twitter.com/AtulChyaKavita
YOUTUBE   - https://www.youtube.com/@atulchyakavita4928/videos
FACEBOOK  - https://www.facebook.com/atulchyakavita
========================================