दिन-विशेष-लेख-राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन-A

Started by Atul Kaviraje, December 08, 2023, 10:05:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                              "राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन"
                             ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-08.12.2023-शुक्रवार आहे. ८ डिसेंबर, हा दिवस "राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     ज्या व्यक्तींचा बुद्धिगुणांक सरासरीपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे ज्यांना भोवतालच्या परिस्थितीशी मिळते – जुळते घेण्यात अडचण निर्माण होते, त्यांना 'मतिमंद' म्हणावे अशा स्वरूपाची व्याख्या अमेरिकन असोशिएशन ऑन मेंटल डेफिशन्सी या संस्थेने केली आहे.

     मतिमंद व्यक्तींमध्ये सामान्यतः मर्यादित बुद्धिमत्ता, भोवतालची परिस्थिती समजण्याची असमर्थता, स्वतःची काळजी घेण्याची असमर्थता, अनाकर्षकता, अपुरा व्यक्तिविकास, अपुरे सामाजिक समायोजन, मन एकाग्र करण्याचा अभाव इ. प्रमुख लक्षणे आढळतात. काही व्यक्तींमध्ये समाजविरोधी कृत्ये करण्याची प्रवृत्तीही आढळते. अमेरिकन असोसिएशनने १९६८ मध्ये बुद्धिगुणांकाच्या आधारे मतिमंदतेचे खालील पाच प्रकार पाडले आहेत :

१.
सीमांत मतिमंद
बुद्धिगुणांक
६८ ते ८३

२.
सौम्य मतिमंद
५२ ते ६७

३.
सर्वसाधारण मतिमंद
३६ ते ५१

४.
तीव्र मतिमंद
२० ते ३५

५.
अतितीव्र मतिमंद
२० ते पेक्षा कमी

     वरील वर्गीकरणापूर्वी मतिमंदतेचे निर्बुद्ध (इडिअट), २० पेक्षा कमी बुद्धिगुणांक; अत्यल्प बुद्धी (इम्बिसील), बुद्धिगुणांक २० ते ५० चे दरम्यान आणि मंदबुद्धी (मोअरन्), बुद्धिगुणांक ५० ते ७० चे दरम्यान असे वर्गीकरण केले जात असे. मतिमंद व्यक्तींपैकी बऱ्याच व्यक्ती बालवयातच मृत्युमुखी पडतात. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर मतिमंदांचे प्रमाण कमी होत जाते. दोन वर्षाखालील मुलांत हे प्रमाण ५ टक्के असते; शालेय वयोगटात ते ३ टक्के असते, तर सर्वसामान्य प्रौढांत ते १ टक्क्यापर्यंत खाली येते. सामान्यतः स्त्रियांपेक्षा पुरूषांमध्ये आणि शहरी विभागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त मतिमंदता आढळते. निकृष्ट आर्थिक – सामाजिक गटांतही हे प्रमाण अधिक असते. संशोधनाअंती असे आढळले की, प्रसूतीच्या वेळेस मेंदू दबला जाणे, लहानपणी मेंदूस इजा, ज्वर होणे; मेंदूत रोगजंतू शिरणे, कंठस्थ ग्रंथीतून पुरेसे आयोडिन न स्रवणे, मेंदूत द्रवपदार्थ साठणे इ. कारणांनी मतिमंदता निर्माण होते. काही व्यक्तींमध्ये आनुवंशिक कारणांमुळेही मतिमंदपणा येतो.

     शैक्षणिक दृष्ट्या मतिमंद व्यक्तींचे शिक्षण देता येण्याजोगे मतिमंद, कौशल्ये शिकविता येण्याजोगे मतिमंद आणि अतिमतिमंद असे प्रकार पडतात. शिक्षण देता येण्याजोग्या मतिमंदांचा बुद्धिगुणांक ५० ते ८० दरम्यान असतो; अशी मुले सहाव्या वर्षी लेखन, वाचन, अंकज्ञान शिकू शकत नाहीत; त्यांना या गोष्टी आणखी काही वर्षांनी शिकता येतात; सामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्ती ज्या कुशल आणि अर्धकुशल गोष्टी करतात, त्या त्यांना थोड्या उशिरा येतात; कौशल्ये शिकविता येण्याजोग्या मतिमंदांचा बुद्धिगुणांक २५ ते ५० च्या दरम्यान असतो; सर्वसामान्य व्यक्तीच्या एकतृतीयांश वेगाने त्यांची प्रगती होते. या व्यक्तींना नेहमीचे शालेय विषय येत नाहीत; मात्र स्वतःचे संरक्षण करणे, यंत्रांबाबत सावधगिरी बाळगणे या गोष्टी येतात; इतरांनी देखरेख व मार्गदर्शन केल्यास ते अर्थोत्पादक गोष्टी करू शकतात. अतिमतिमंद व्यक्तींचा बुद्धिगुणांक २५ पेक्षा कमी असतो. या व्यक्तींची इतरांनी काळजी घ्यावी लागते. त्यांतील काहींना जेवता – खाता येते, चालता – बोलता येते; परंतु काहींना सतत अंथरूणातच काळ कंठावा लागतो. या प्रकारच्या व्यक्ती लहानपणी दगावण्याचा संभव अधिक असतो. यांना कुशल, अर्धकुशल असे काहीच शिकविता येत नाही; कारण त्यांची मानसिक वाढ ४ वर्षांच्या मुलांपेक्षा अधिक होत नाही.

          मतिमंद मुलांना कोणतीही गोष्ट शिकविण्यात पुढील प्रमुख अडचणी येतात--

     एकाग्रता व संवेदना यांचा अभाव; भावनिक अपरिपक्वता; उतावीळपणा; स्मरण आणि विचार यांमधील दोष; भाषाप्रभुत्वातील अडचण. मतिमंदांमध्ये या सर्वच गोष्टी आढळतात, असे नाही. मात्र सामान्यतः या अडचणी कमीजास्त प्रमाणात सर्वामध्ये आढळतात.

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विकासपीडिया.इन)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2023-शुक्रवार.
========================================