दिन-विशेष-लेख-राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन-D

Started by Atul Kaviraje, December 08, 2023, 10:11:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     "दिन-विशेष-लेख"
                              "राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन"
                             ---------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-08.12.2023-शुक्रवार आहे. ८ डिसेंबर, हा दिवस "राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

     कायदेशीर पालकत्वाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा शासनस्तरावर लवकरात लवकर करण्यात यावा. मतिमंद मुलांना शिकविणे अवघड असले तरी अशक्य नसते. मतिमंदांवर मायेची पखरण करावी लागते. अपत्याला सांभाळणे अवघड नाही, पालकांनी वस्तुस्थितीचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. माझे मूल मतिमंद आहे या वस्तुस्थितीचा स्वीकार पालकांनी करणे हे मतिमंदांच्या पुनर्वसनाबाबतचे पहिले पाऊल आहे. पालकावर प्रथम संस्कार झाले पाहिजेत. ग्रामीण भागात शेतीप्रधान संस्कृतीमुळे बारा गावगाड्याच्या पद्धतीमुळे मतिमंदांना उत्पादकतेशी निगडित करणे शक्य आहे. लोहाराच्या घरी भाता चालवणे, कुंभाराच्या घरी माती तुडविणे, शेतकऱ्यांच्या घरी पाखरांना हाकलणे, गुरांच्या मागे राहणे या प्रकारे मतिमंदांचे समायोजन शक्य आहे.

     ज्या व्यक्ती मतिमंद व मानसिक आजारी आहेत, त्यांचा अपंग म्हणून फेरविचार शासन करत असल्याचे ऐकिवात आहे. शारीरिक प्रकृतीशी निगडित आजार म्हणून मानसिक आजाराबाबत कदाचित संयुक्तिक ठरेल, परंतु मतिमंदत्वाबाबत निश्चितपणे आज कसल्याही प्रकारचे औषधोपचार नाहीत, शस्त्रक्रिया-टाॅनिक नाही. म्हणून आजही मतिमंदत्व हा अस्पर्शित विषय आहे. १९९५ मध्ये अपंगत्वासंबधी कायदा करण्यात आला. त्यात सात प्रकारचे अपंगत्व स्पष्ट करताना मतिमंदत्व असलेल्यांचा समावेश केला होता. पाश्चिमात्य राष्ट्रात जगण्यास सक्षम असणाऱ्या व्यक्तींचा प्राधान्याने (Survival of fittest) उल्लेख/विचार केलI जातो, परंतु भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस जगण्याचा अधिकार घटनेतील तरतुदीतच आहे (Right to survive). मतिमंदाना न्याय देण्यासाठी सांगोपांग विचार व्हावा म्हणून मतिमंदांचे पालक, विशेष शिक्षक, बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ तसेच काही आस्था असणारे संस्थाचालक यांचा अभ्यासगट करावा. त्यात उपरोक्त सर्व बाबींचा साकल्याने विचार करावा. शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे. मतिमंदांचे पुनर्वसन हे कार्य सतीचे वाण आहे. म्हणूनच मतमंदाच्या पुनर्वसनाबाबत विशेष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पारितोषिकांसाठी मतिमंदांच्या विशेष शिक्षक-शिक्षकेतरांसाठी स्वतंत्र वेगळा प्रवर्ग असावा असे सुचवावेसे वाटते.

--By Dr.Ramdas Ambulgekar
--------------------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-दिव्य मराठी.भास्कर.कॉम)
                 -------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2023-शुक्रवार.
========================================