दिन-विशेष-लेख-संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा-D

Started by Atul Kaviraje, December 11, 2023, 09:18:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    "दिन-विशेष-लेख"
                         "संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा"
                        ----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-11.12.2023-सोमवार आहे. ११ डिसेंबर, हा दिवस "संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

        श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे अनमोल सुविचार | Sant Dnyaneshwar Maharaj quotes--

     संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन १२७५ मध्ये भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठी आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल पंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. विवाहानंतर त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली होती, परंतु गुरुदेवांच्या आज्ञेनुसार त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश करावा लागला. त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि सोपान नावाचे तीन मुलगे आणि मुक्ताबाई नावाची मुलगी झाली. संन्यास-दीक्षा-स्वीकृतीनंतर या मुलांचा जन्म झाल्यामुळे त्यांना सतत 'संन्यासींची मुले' अशी अपमानास्पद संज्ञा सहन करावी लागली. त्यावेळच्या समाजाने दिलेल्या आदेशानुसार विठ्ठलपंतांनाही देह त्याग करावा लागला.

     भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपाष्टी व हरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.

-माझा जन्म कुठे व्हावा,
कोणत्या जाती धर्मात व्हावा,
आई वडील कसे असावेत,
हे माझ्या हाती नव्हते,
त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी
मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा
सकारात्मक वापर करून
माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.

-कधीतरी मला कोणत्या तरी
प्रकारचे दु:ख मिळणार आहे
याची जाणीव ठेऊन,
मी माझ्या आसपासच्या माणसांची
जमेल तशी मदत केली पाहिजे

-मी स्त्री व्हावे कि पुरुष,
काळा कि गोरा,
माझ्या शरीराची ठेवण,
सर्व अवयव ठीकठाक असणे ,
हे देखील माझ्या हाती नव्हते
मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे,
योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे

-हे विश्व मी निर्माण केलेले नाही.
किंवा हे विश्व कसे असले पाहिजे,
या माझ्या मताला देखिल काही किंमत नाही.
तेव्हा, हे असे का ? , ते तसे का ?, असे का नाही?
वैगेरे प्रश्न विचारत राहून वैताग्ण्या ऐवजी,
जे चूक आहे, अयोग्य आहे ते किमान
मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल,
हे हि नसे थोडके!

-आज जरी यश, सुख,
समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली,
तरी उद्या किंवा कधीही
नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेऊन,
मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे

-माझ्या आसपास असलेल्या लोकांनी,
माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी
माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले,
तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे.
संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे

-माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना,
परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते.
मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन
नक्कीच माझ्या हाती आहे.

-ज्ञानी लोकांच्या सानिध्यात
राहुनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता
त्यांच्यात वाईटच शोधत बसतात

-देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणें मुक्ती चारी साधियेल्या

-हेंचि दान देगा देवा| तुझा विसर न व्हावा||

--हॅप्पी मराठी
-------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हैप्पी मराठी.कॉम)
                     ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.12.2023-सोमवार.
========================================