जमाखर्च

Started by शिवाजी सांगळे, December 12, 2023, 07:59:11 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जमाखर्च

प्रश्न संपता संपत नाही उत्तर काही मिळत नाही
चालतो अखंड प्रवासी मार्ग काही सापडत नाही

शोध अस्तित्वाचा, कधी स्वतःच्या घेण्यास गेलो
विश्व असून सारे भोवताली मीच कुठे उरत नाही

जमाखर्च जगल्या क्षणांचा मांडावा कुठवर कुणी
ताळमेळ सुख दु:खांचा, का नेमका लागत नाही

ठेवते लक्ष पक्षीणी, जसे पिल्लांवरती ते दूरूनी
आम्हास का, बारकाईने तसे काही दिसत नाही 

लोभात आपल्याच काय सांगू गुंतलोय मी कसा
हावरट आतला माझ्या शिवाय दुसरे पहात नाही

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९