परी

Started by mkapale, January 24, 2024, 09:24:59 AM

Previous topic - Next topic

mkapale

परी

एका साध्या माणसाला परी भेटली तर
स्वप्नात जशी दिसली तशी समोर आली तर

शब्द विरून जातील , डोके फिरून जाईल
तिने ते पाहून मला वेडा समजले तर

छोट्या छोट्या साध्या गोष्टी मी करत जाईन
तिलाही त्या गोष्टींमधे गम्मत वाटली तर

ती सुंदर लक्षवेधी , हसू पाकळ्या उधळणारे
विस्कटलेला गबाळा मी तिला मोहक वाटलो तर

बोलके तिचे डोळे, पाहत राहू कि नाही वाटे
माझ्या नजरतल्या प्रश्नाला तिने होकार दिला तर

ती नाजूक , फुलांच्या शहरात राहणारी
मातीतले राकट हात माझे तिला बोचले तर

ती म्हणाली परी नाही , मीही एका मुलगी आहे
साथ देईन ,छान मुलासारखे मला प्रेम देशील जर

ती परी अजूनही आहे , राणी माझी लाडाची
तिने बनवलंय राजा मला, महाल बनवलंय घर