निखिल वागळेंचं सत्य

Started by vishal maske, February 11, 2024, 09:29:40 PM

Previous topic - Next topic

vishal maske

निखिल वागळेंचं सत्य

निप:क्ष पाहिला, निर्भिड पाहिला
मात्र लाचार कधी दिसला नाही
चिरफाडात सत्य शोधताना
भयभीत कधीही वाटला नाही

समाजाचा आरसा बनताना
धुळ कायम दुर ठेवली आहे
छुपी गोष्टही उघड करून
समाजासमोर दावली आहे

अन्याय अत्याचार समजताच
पहिली बातमी त्याची असते
जनतेचा आवाज उठवताना
त्याला कुणाची गोची नसते

म्हणुनच समाज मनात त्याने
त्याची जागा बनवली आहे
जनतेचं प्रेम, आपुलकी सोबत
इज्जत ही त्याने कमवली आहे

सत्य सांगणाराचं तोंड सदा
नको तितकं बळकट असतं
कारण त्याच्या प्रतिमेला तर
कधी लाचारीचं कळकट नसतं

म्हणुनच ताठ मान ठेवुन
तो आजचा सवाल उठवतो
त्याच्या प्रश्नांनी समोरच्याच्या
डोक्याच्या आट्या गोठवतो

आजचा सवाल पाहून पाहुन
लोक ही हुशार झाले आहेत
त्याच्या परस्परच लोकांनी
त्याचे प्रचार ही केले आहेत

समाजाचे वास्तव मांडताना
वाइट अनुभवही भोगले आहेत
ज्यांचे गुणगान मी गातो आहे
ते पत्रकार निखिल वागळे आहेत

होय, त्यांचे प्रश्न, त्यांच्या भुमिका
आम्ही सदैव पाहिल्या आहेत
प्रतिगामींना झोंबतील अशा
खुट्या त्यांनी रोवल्या आहेत

त्याचाच परिणाम म्हणुन तर
वागळे त्यांना टोचु लागले
आगी फोकाच्या नादी लागुन
ते मन गाभार्यात नाचु लागले

सत्याचा आवाज दाबन्यासाठी
वागळेंना आवरणं गरजेचं आहे
पण सत्याची मांडणी करताना
वागळेंच बळही बेरजेचं आहे

हा संतापलेला झंझावात आहे
याला विझवणाराच जळतो आहे
जेवढा उलगडत जाऊ तेवढा
निखिल वागळे कळतो आहे

फुले, शाहु, आंबेडकरांच्या
विचारांचा बोलण्यात ठसा आहे
शिवरायांच्या स्वाभिमानाचा
मनात त्यांच्या वसा आहे

निखिल वागळेंना रोखायला
भक्तांचे फडच्या फड आलेत
पण तरीही हुकमी राजवटीला
निखिल वागळे जड झालेत

त्यात ही मजबुत मुसंडी देऊन
वागळेंचा ताठर मारा आहे
निर्भय बनो, निर्भय बनो
वागळेंचा जनतेला नारा आहे

निखिल वागळेंच्या संघर्षाला
खरच सलाम केला पाहिजे
लोकशाही च्या विजया साठी
मतदार निर्भय झाला पाहिजे

ॲड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड
मो. 9730573783