भेळ

Started by शिवाजी सांगळे, May 29, 2024, 01:07:19 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भेळ

आजकाल राजकारणाची
चटकदार भेळ होवू लागली आहे

कोण कांद्यासारखा तिखट
तर कोणी चिंचेचा कोळ झाला आहे

चवदार करायची म्हणतांना
विचित्र जिन्नसाचा अजब मेळ आह

जनतेच्या चाखत्या जिभेला
मात्र विकत घेतलेला बेचव खेळ आहे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९