"गाव"

Started by स्वप्नील वायचळ, November 24, 2010, 11:28:38 AM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

                   "गाव"
हिरव्या हिरव्या शेतांमधली कोवळी कोवळी पाने
वाऱ्यासंगे डोलत गाती आनंदाचे गाणे
गहू ज्वारी मक्याचे ते मोत्यावानी दाणे
चिमण्यांच्या पिल्लांचे ते आवडीचे खाणे
मोडक्या तोडक्या काड्या नि वाळलेली पाने
जोडलेल्या घरट्यांमध्ये कपाशी बिछाने
खळखळ वाहत्या नदीचे ते गोड गोड पाणी
पाण्यामध्ये डुंबत राहते म्हशींची महाराणी
आंबट चिंचा, बोरे आणि बाभळीची राने
गावामधल्या पोरांची ही मस्तीची ठिकाणे
वर्णू किती महिमा आणिक माझ्या या गावाचा
अपुरी पडते त्यास माझी वाणी आणि वाचा
                            -स्वप्नील वायचळ

आपल्या प्रतिक्रिया प्रतिक्षेत ........

santoshi.world