"वर्षाराणी "

Started by स्वप्नील वायचळ, November 24, 2010, 11:37:38 AM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

                   "वर्षाराणी "
कडकडाडत  वाजत गाजत आगमन करते वर्षाराणी
उन्ह कडाक्यात भाजल्या जीवांवर मंतरते जीवनपानी
झरे पाझरतात बीज अंकुरतात मातीचाही सुगंध येतो
आनंदाने भान हरपून कोकीळ गातो मोर नाचतो
कृश झालेले नद्या ओढे होतात सुदृढ लठ्ठ
जीवांचे जीवनाशी नाते होते पुन्हा घट्ट
वातावरणामध्ये पसरतो नवजीवनाचा सुवास
ऋतुचक्राचा सुरु होतो पुन्हा नवा प्रवास
                                       -स्वप्नील वायचळ

प्रतिक्रिया अपेक्षित.... :)

santoshi.world