" देव म्हणतो...."

Started by स्वप्नील वायचळ, November 24, 2010, 12:15:18 PM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

         " देव म्हणतो...."
विश्वामध्ये माणसाचे काम आहे काय
उमगेना काही धरले देवाचेच पाय
देव म्हणतो विश्वाचा या मीच आहे कर्ता
माझ्याविना विश्व म्हणजे काळोखातील गर्ता           
देवा अरे म्हटले तू आहेस तरी कुठे
तुझ्या घरचा रस्ता सांग कोण दिशा फुटे?
देव म्हणतो वेड्या तू बाहेर घेतोस शोध
मनात तुला माझा होत नाही का बोध
स्वार्थ मत्सर क्रोधाने तू होऊ नकोस अंध
माणूस आहेस माणुसकीचा विसरू नकोस गंध
                              -स्वप्नील वायचळ

प्रतिक्रिया अपेक्षित....

hpmah21@gmail.com

Hi swpanil...
very nice one... keep posting such type of poems...


santoshi.world



बाळासाहेब तानवडे



charudutta_090


sanjayfiat55@gmail.com

are manasa manasa kadhi hoshil manus..tumachi kavita vachun bahinabainchi athavan zali...good one keep it up..sanjay