षोडश वर्षीय मुलीची कविता

Started by Atul Kaviraje, September 29, 2024, 09:10:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, मला त्यादिवशी भेटलेल्या एका षोडश वर्षीय मुलीची कविता--

कलिकेचे सुंदर फुल होऊ पाहतय
मुली, हळूहळू तुझं यौवन बहरतंय
स्वप्न पहाण्याचे हेच दिवस तुझे,
कुणीतरी भेटण्यासाठी मन तुझं उचंबळतंय.

षोडश वर्षीय सुंदर  कुमारिका तू
तारुण्यात पदार्पण आहेस करीत तू
अनेक भावना दडल्यात तुझ्या मनात,
आठवणी सुंदर साठल्यात तुझ्या अंतरात.

चाहूल लागतेय तुला अनपेक्षित प्रीतीची
अंतरात रुजत चाललेल्या उदात्त भावनेची
कुणी राजकुमार रोज येतोय स्वप्नांत,
प्रेमाने हात घेतोय तुझा हातात.

तुझ्या डोळ्यांत दिसतंय प्रेम मला
अवचित तुझा चेहरा बोलका झाला
ओठही विलगलेत हास्यात सुंदर तुझे,
मनात घोंघावतेय वादळ भाव भावनांचे.

नकळत तुझा हात खेळतोय केसांशी
भान विसरून स्वतःचे, धुंद होशी
विचारांचे मोहोळ जाणवतंय उठलेले मनात,
येणाऱ्या वादळाची चाहूल दिसतेय नयनांत. 

आवर चंचल मन, तुझं मुली
हे वय असंच असतं, मुली
चांगलं वाईट कळण्याच्या पलीकडे जग,
नाही ओळखता येत दुनियेचे रंग.

विचार तुझ्या मनात दडलेत अनेक
कल्पनातीत आहे तुझ्या मनाचा वेग
एक विचार येता, पटकन विरतो,
त्याच्या जागी दुसरा स्थान घेतो.

अतिचपळ, चंचल अशीच असते मनोदशा
करावे, न-करावे अशीच असते मनोवस्था
एकापाठोपाठ विचारांची येत असते मालिका,
जंजाळात विचारांच्या हरवनूच जाशील पहाता-पहाता.

आहेस जरी शांत, निवांत बसलेली
उलथापालथ चाललीय तुझ्या मनात मुली
कुमारिके, तुझी पावले तारुण्याकडे वळताहेत,
बालपणीचा उंबरठा ती आज ओलांडताहेत.

रुप तुझे हळूहळू बहरत चाललंय
तुझ्या देहबोलीवरून ते जाणवू लागलंय
अबोल आहेस तरी डोळे बोलताहेत,
मनातला भाव ते स्पष्टपणे दाखवताहेत.

भावला मला तुझा साधेपणा, सरळपणा
नयनांतील भाव तुझ्या दाखवतोय करुणा
चेहरा सुंदर, तुझे डोळेही सुंदर,
अंतरंग असावे तुझे त्याहूनही सुंदर.

आठवणीत अजुनी गुंतलय तुझं मन
तरी परिस्थितीचे निश्चितच आहे भान
स्वप्नातून ये बाहेर, खऱ्याच्या दुनियेत,
अस्मानात घे भरारी, उंच-उंच छान.

--अतुल परब
--दिनांक-29.09.2024-रविवार. 
===========================================