सुंदर गोरी ललना

Started by Atul Kaviraje, October 10, 2024, 10:03:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

सुंदर गोरी ललना--

सुंदर गोरी ललना, प्रेमाने पाहते
तपकीरी रंगाचा, रेशमी पोशाख शोभतोय देहावर
मान तिरकी करून, हळूच गालात हसते,
आनंद वाहतोय ओसंडून, भरभरून.

मांडीवर हात, हातावर हात ठेवून
बसण्याची दिलखेचक, मोहक अदा आहे
उजव्या हातात शुभ्र मण्याची वळी सुरेख,
नाजूक बोटात आकर्षक सोनरी अंगठी सुबक.
 
सुंदर मोकळे काळे केस, रुळती डाव्या खांद्यावर
लाल लिपस्टिक शोभते, ओठांच्या कडांवर
नाजूक लहान टिकली, कपाळावर टिकलीय,
कानात अतिसुंदर भारी, धातूची रिंग झुललीय.

हसून पाहते, अजब तुझ्या डोळ्यातलं गूढ
प्रेमाच्या या नात्यात, सापडतो सुखद सूर
हसणं तुझं सुंदर, तू मनातली नयनतारा,
सर्वांच्या हृदयात, तूच आहेस अनमोल तारा.

अशा या मधुर क्षणी, गोड गाणी उमटतात
प्रेमाच्या विश्वात, नवे क्षण साकारतात
सुंदर गोरी ललना, तुच आहेस साज,
तुला बघताना, जीवनात येतो सुखद राग.

--अतुल परब
--दिनांक-10.10.2024-गुरुवार.
===========================================