प्रेम

Started by Shweta261186, December 09, 2010, 10:49:10 PM

Previous topic - Next topic

Shweta261186

आजवर नव्हते ठाव मला
प्रेम कुणावर करतात कशाला?
आजवर नव्हते ठाव मला
प्रेम खरे म्हणतात कशाला?

पण ऐक तुझ्याविन आता
एक क्षणही नकोसा होतो
दुराव्याने तुझ्या
नयनी पूर दाटतो
हाच कदाचित सख्या
प्रेमाचा सागर असतो

तुझ्या संगतीने माझ्या
जिण्याला अर्थ येतो
स्पर्शाने तुझ्या
सर्वांगाला बहर येतो
हाच कदचित
प्रेमाचा अर्थ असतो

आजवर नव्हती ठाव मला
प्रेमाची कुठली असते भाषा
आजवर नव्हती ठाव मला
प्रेमाची कुठली असते दिशा

पण आज आठवासोबत तुझ्या
प्रेमात चिंब भिजते
अनामिक एका स्पर्शाने
हळूच मी थरथरते
असेच काही रे
प्रेमात घडत असते

सहवासात तुझ्या
मनी मोरपिसे फिरती
रोजचेच चंद्र तारे
नवीन आज भासती
यालाच रे जिवलगा
प्रेम असे म्हणती

प्रेमाची ही भाषा
जेव्हा उमजली आज मला
प्रेमाची ही दिशा
जेव्हा गवसली आज मला

मिठीत तुझ्या सामावण्या
बंध तोडूनी मी धावले
ऐक रे हे साजणा
तुझीच आज मी जाहले...

                       श्वेता देव
                     

sachink

ekdam surekh....chan rangawali ahes....


prachidesai


aniket8890

मैत्री केली आहेस  म्हणुन तुला  सांगावस वाटतय....................
 
  गरज म्हणून  'नातं ' कधी  जोडू नकोस
  सोय म्हणून  सहज असं  तोडू नकोस..!
 
  रक्ताचं नाही  म्हणून, कवडीमोल  ठरवू नकोस
  भावनांचं मोल  जाण..मोठेपणात  हरवू नकोस..!
 
  आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं  जुळत असतं
  जन्मभर पुरेल  इतकं भरून  प्रेम मिळत  असतं..!
 
  तुझी ओंजळ  पुढे कर,  कमीपणा मानू  नकोस
  व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये  आणू नकोस..!
 
  मिळेल तितकं  घेत रहा,  जमेल तितकं  देत रहा
  दिलं घेतलं  सरेल तेव्हा..  पुन्हा मागून  घेत रहा..!
 
  समाधानात तडजोड  असते...फक्त  जरा समजून  घे
  'नातं ' म्हणजे  ओझं नाही,  मनापासून उमजून  घे..!
 
  विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही  देऊ नकोस
  जाणीवपूर्वक 'नातं ' जप॥ मध्येच माघार  घेऊ नको!
[size=0pt] [/size]

premkavita

hi shweta how r u?
kavita chan ahe. premat padlelyana asach kahi anubhav yet asto pan .... prem kartnana tyachavar kinva tichyavar ... vishwas theva ani .... understanding
most important in this relationship............ good nice one this kavita


rudra

farach chan prayatna aahe tuzha shweta................................ 8)


pp_onkar

खूप छान लिहीले रे मैत्रीबद्दल ..