देव माझा (अभंग)

Started by सूर्य, December 10, 2010, 02:39:15 PM

Previous topic - Next topic

सूर्य


असा आहे एक ! देव मना मध्ये !
वाजवितो वाद्ये ! देव माझा !!

घडविले मला ! तुम्हा संत जणा !
आयुष्याचा कणा ! देव माझा !!

सारा सार जो हां !अठरा पुराणे !
गावे ज्याचे गाणे ! देव माझा !!

ज्ञान दीप म्हणे ! तैसा तो मिळावा !
आगळा वेगळा ! देव माझा !!



सूर्य


वाचा ज्ञानेश्वरी ! रामदास गाथा !
झुकवाल माथा ! देवा पुढे !!

तुम्हा वरी कृपा ! होइल हो त्याची !
भीती न कुणाची ! देवा पुढे !!

आयुष्याचे दान ! दिले ज्याने असे !
निराकार भासे ! देवा पुढे !!

ज्ञानदीप म्हणे ! नाशिवंत देह !
श्रुष्टि ही विद्रेह ! देवा पुढे !!


सूर्य

खरा देव कसा ! ओळखाल तुम्ही !
नाशिवंत जन्मी ! कटु सत्य !!

मुर्खाचे लक्षण ! ठावे कुणा कुणा !
देव नाही जुना ! गोड सत्य !!

दयाल का रे तुम्ही ! रचना आकार !
चुकेल उधार ! जन्मो जन्मी !!

ज्ञानदीप म्हणे !खरा एक देव
अंतरीचा ठेव ! तुम्ही जाणा !!


सूर्य

कसा आहे देव ! कसा असेल तो !
भाकर जो देतो ! देव माझा !!

सारा सार आहे ! निर्गुण आकार
दृष्टी ज्याची पार !अनंतात !!

ज्ञान दीप म्हणे ! ओळखाहो तुम्ही
व्हाल तसे सुखी ! आपणही !!


ज्ञान दीप (संदीप )