"ये दिवाळी ये, तुझे मी स्वागत करते,लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी मी, तुजला ओवाळते."

Started by Atul Kaviraje, October 30, 2024, 07:05:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

"ये दिवाळी ये, तुझे मी स्वागत करते,
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी मी, तुजला ओवाळते."

ये दिवाळी ये
तुझे मी स्वागत करते
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी मी,
तुजला ओवाळते.

पणतीची ज्योत, दिव्यांचा प्रकाश
तुझ्या आगमनाने, झालाय खास
सण साजरा, सर्वांच्या मनात,
तुझ्या सोबत, आनंद गगनात.

रांगोळीचे रंग, साज सजावट
मिठाईची, फराळाची भारी लयलूट
सर्वांच्या हृदयात, तुझे स्थान,
ये दिवाळी ये, तुझे करते अभिवादन. 

--अतुल परब
--दिनांक-30.10.2024-बुधवार.
===========================================