पाउल

Started by charudutta_090, December 23, 2010, 09:32:21 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

पाउल
तो डिसेंबरचा शेवटला आठवडा,थंडी जणू चवताळली होती;
आपल्या टुमदार कुंडीतल्या झाडांना,दवांनी भिजाऊन गेली होती,
तू कोवळ्या सूर्य किरणांची वाट पाहत,पुढल्या अर्ध्या कठड्यावर,टेकली होतीस ;
माझ्या गोड खोड्या अजून धीटावतील,म्हणून माझ्याशी नजरत नव्हतीस,
अखेरीस शालीत गुंडाळून, तू पूर्णपणे स्वतःला उन्हात शेकवून घेतलं;
मी मात्र झाडांना पाणी घालत,अझुनच स्वतःला गारठावून घेतलं,
त्या कोवळ्या उन्हाच्या तिरीपेनं अशी खुल्लीस,जशी फुलकळीच बहारली;
गुंडाळलेल्या शालीत,माझ्या उडवलेल्या पाण्यानं,ओलावून शहारली,
गारठलेल्या माझ्या लाल नाक शेंड्याला तू पहिल्या दोन बोटानं घेतलेला तो चिमटा;
आणि तुझ्या शालीनं उब्लेल्या,नरम गुलाबी तळव्यांना,मी तो लावलेला गार अंगठा,
कशी झटक्यानं तू क्षणात विजेगत काटावलीस,जणू माझ्या पुढल्या खोडीची लागली चाहूल;
कुठे दौर्यावर एकटा, तशाच थंडीत आठवतोय, तुझा तो नरम तळवा व ते नाजूक पाउल...
चारुदत्त अघोर .(दि.२२/१२/१०.)