पणतीच्या ज्योतीने मी पेटवते, समईची वात

Started by Atul Kaviraje, November 01, 2024, 05:12:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

"पणतीच्या ज्योतीने मी पेटवते, समईची वात,
दिवाळी जेव्हा जेव्हा तू येतेस, मी रहाते आनंदात."

पणतीच्या ज्योतीने मी पेटवते
समईची वात
दिवाळी जेव्हा जेव्हा तू येतेस,
मी रहाते आनंदात.

घराची साफसफाई, सजावट सुरू
भिंती नवा रंग लागल्यात  पांघरू
सर्वत्र वाजतोय प्रेमाचा सुर,
तुझ्या येण्यात आहे आगळाच नूर.

फटाक्यांच्या आवाजात, गोड मिठाईच्या वासात
तु येताना असते, सारे वातावरण आनंदात
पणतीच्या प्रकाशात, आकाशकंदील आकाशात,
दिवाळीच्या या सणात, मी असते विहरत फुलांत.

तू माझ्या मनात दिवा जळवतेस
दुःख विसरावयास लावतेस, आणि प्रेम भरतेस
तुझ्या संगतीत अंधार दूर करतेस,
दिवाळी तू माझ्या मनात रहातेस.

पणतीच्या ज्योतीने मी पेटवते
समईची वात
दिवाळी जेव्हा जेव्हा तू येतेस,
मी रहाते आनंदात.

--अतुल परब
--दिनांक-01.11.2024-शुक्रवार.
===========================================