शुभ संध्याकाळ, शुभ शुक्रवार

Started by Atul Kaviraje, November 01, 2024, 08:14:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, शुभ संध्याकाळ, शुभ शुक्रवार.

शुभ संध्याकाळ !

संध्याकाळची शांती, सुंदर रंगांची छाया
सूर्याच्या किरणांचा एक अद्भुत नवा पाया
एकीकडे आकाशात दिसते ताऱ्यांची चमक,
संध्येच्या गालिच्यावर, रंगांचे नक्षीकाम सुबक.

गडद आभाळात पसरले सोनेरी रंग
पानांवरले ओघळते थेंब, पहाण्यात दंग
गंध फुलांचा, गातो निसर्गाचे गीत,
शुभ संध्याकाळ, मनाला मिळतो मनमीत.

मनाच्या गाभाऱ्यात शांतीची लाट
पूर्ण झाली आता दिवसभराची बात
संध्याकाळच्या या क्षणांत, होऊ दे नवी सुरुवात,
सुख, प्रेम आणि आनंदाने सजलेली प्रत्येक रात.

शुभ संध्याकाळ, तुमच्या जीवनात प्रेम झळको,
सुखाच्या सोबतीने, प्रत्येक क्षण गोड होवो !

--अतुल परब
--दिनांक-01.11.2024-शुक्रवार.
===========================================