शुभ दुपार, शुभ शनिवार

Started by Atul Kaviraje, November 02, 2024, 12:58:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्रांनो, शुभ दुपार,  शुभ शनिवार. 

शुभ दुपार !

शुभ दुपार, उजळते आकाश
सूर्याच्या किरणांत, विशेषता खास
दिवसाच्या मध्यामध्ये, लपलाय आनंद,
उत्साहाच्या थाटात, सर्वांनाच होतोय परमानंद.

साफ हवा आहे, पण जरा थंडगार
सर्वत्र बहरलाय, रंगीत संसार
संबंधांची गोडी, एकत्र करते लीलया,
या शुभ दुपारी, सर्वांना मिळते माया.

कामाच्या थकव्याला, देत एक विराम
एक कप चहा, मित्रांचा सजतोय धाम
गप्पा आणि हसणे, होतात अविरत,
शुभ दुपारची गोष्ट, अन मस्त क्षण बनत.

दुपारचा उजेड, मनात भरणारा
सप्नांच्या जगात, घेऊन जाणारा
शुभ दुपार, आनंदाचे गाणे,
सर्वांच्या चेहऱ्यावर, हसरे तराणे.

हसत जगावे, आनंदात रमावे
शुभ दुपारी, प्रेम द्यावे घ्यावे
सर्वानी एकमेकांना प्रेम वाटावे,
शुभ दुपार म्हणत, एकत्र यावे !

--अतुल परब
--दिनांक-02.11.2024-शनिवार.
===========================================